105 Historical Artifacts: "यांची खरी जागा भारतात..." 105 ऐतिहासिक कलाकृती लवकरच मायदेशी

USA: ही शिल्पे दुसरे ते तिसरे शतक ते 18व्या ते 19व्या शतकातील आहेत. यातील काही कलाकृतींची चोरी झाली तर काही गहाळ झाल्याने अमेरिकेसह जगभरात गेल्या आहेत.
105 Historical Artifacts
105 Historical ArtifactsDainik Gomantak
Published on
Updated on

USA repatriated 105 trafficked antiquities to India: अमेरिकेचे भारतातील राजदूत एरिक गार्सेटी यांनी सांगितले की, अमेरिकन सरकार प्राचीन आणि ऐतिहासिक शिल्पे आणि कला संग्रह भारताला परत करण्याची तयारी करत आहे.

हा कलासंग्रह हा भारताचा विश्वास असून तो भारतातच असायला हवा, असे मत अमेरिकन राजदूताने व्यक्त केले.

कलाकृती अमेरिकेत कशा पोहोचल्या?

अमेरिका भारताच्या 105 प्राचीन आणि ऐतिहासिक मूर्ती तसेच कलाकृती भारताला परत देण्याची तयारी करत आहे. ही शिल्पे दुसरे ते तिसरे शतक ते 18व्या ते 19व्या शतकातील आहेत.

अमेरिकेचे राजदूत म्हणाले की, आम्ही कला संग्रह भारतात परत करण्याच्या दिशेने काम करत आहोत. अनेक वेळा भारतातील कलाकृती चोरल्या जातात किंवा बेकायदेशीरपणे अमेरिका किंवा जगातील इतर देशांमध्ये पोहोचतात.

105 Historical Artifacts
USA Military Emails: एका 'I' ने केला घात अन् अमेरिकेची सारी गुपिते गेली 'माली'च्या हातात

सांस्कृतिक संपदा करारावर चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले होते तेव्हा भारत आणि अमेरिका यांच्यातील सांस्कृतिक संपदा करारावर चर्चा झाली होती. त्यामुळे ऐतिहासिक वास्तूंचा अवैध काळाबाजार थांबणार आहे.

यासोबतच दोन्ही देश याबाबत बोलत आहेत आणि भविष्यात बेकायदेशीरपणे अमेरिकेत पोहोचलेल्या भारताच्या ऐतिहासिक वास्तूही परत केल्या जातील, अशा तरतुदी केल्या जात आहेत.

105 Historical Artifacts
Princess Diana's Iconic Sweater: गोष्ट 42 वर्षांपूर्वीच्या स्वेटरची... प्रिन्सेस डायना यांनी वापरलेल्या स्वेटरचा होणार लिलाव

अमेरिका वैदिक काळातील मूर्ती परत करणार

एरिक गार्सेटी यांनी सांगितले की, अमेरिकेतील अॅरिझोना येथे भगवान बुद्धांची एक सुंदर मूर्ती आहे, जी लवकरच भारतात परत केली जाईल.

यासोबतच वैदिक काळातील हिंदू मंदिरातील अनेक कलाकृतीही परत केल्या जाणार आहेत. न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्टमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, ज्यात अमेरिकेचे भारतातील राजदूत एरिक गार्सेटी आणि अमेरिकेतील भारताचे राजदूत तरनजीत सिंग संधू उपस्थित होते.

दरम्यान, एरिक गार्सेटी यांनी या गोष्टी सांगितल्या. कार्यक्रमादरम्यान बौद्ध इतिहासाशी संबंधित कलाकृतींचे प्रदर्शन करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com