''हा मी त्याची हत्या केली'', 10 वर्षाच्या मुलाने दिली गुन्ह्यची कबुली; कारण जाणून पोलीसही थक्क

America Crime News: दोन वर्षांपूर्वी अमेरिकेतील टेक्सासमध्ये एका व्यक्तीची झोपेत असताना गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.
Crime News
Crime NewsDainik Gomantak

America Crime News: दोन वर्षांपूर्वी अमेरिकेतील टेक्सासमध्ये एका व्यक्तीची झोपेत असताना गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास केला, मात्र मारेकऱ्यांपर्यंत ते पोहोचू शकले नाही. या प्रकरणाला नाट्यमय वळण लागल्याने तपास यंत्रणांना हादरवून सोडणाऱ्या या मर्डर मिस्ट्रीची फाईल जवळपास रखडली होती. वास्तविक, त्या व्यक्तीचा खून करणारा दुसरा कोणी नसून एक 10 वर्षांचा मुलगा होता. तथापि, गुन्ह्याच्या वेळी त्या मुलाचे वय 10 वर्षांपेक्षा कमी होते, त्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल करता येणार नाही.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, गोन्झालेस काउंटी शेरीफ कार्यालयाने सांगितले की, एका 10 वर्षांच्या मुलाने आपणच खून केल्याची कबुली दिली. ब्रँडन ओ क्विन वय वर्ष 32, हे 18 जानेवारी 2022 रोजी टेक्सासच्या लेझी जेआरव्ही पार्कमध्ये मृतावस्थेत आढळले होते. ते काही दिवसांपूर्वीच येथे आले होते. मृतदेहाची तपासणी केली असता त्यांच्या डोक्यात गोळी मारुन हत्या केल्याचे उघड झाले होते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, अचानक हे मूल पोलिसांच्या हाती कसे लागले? वास्तविक, 12 एप्रिल रोजी स्कूल बसमध्ये दुसऱ्या विद्यार्थ्यावर हल्ला करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी या मुलाला ताब्यात घेण्यात आले होते. यावेळी बोलताना त्याने दोन वर्षांपूर्वी कोणाची तरी हत्या केल्याचे धक्कादायक वक्तव्य केले होते.

Crime News
America Crime: 41 सेकंदात 100 राऊंड फायरिंग... सीट बेल्ट न लावलेल्या व्यक्तीचा पोलिसांच्या चकमकीत मृत्यू

यानंतर मुलाला चाइल्ड ॲडव्होकेसी सेंटरमध्ये नेण्यात आले, जिथे त्याने ब्रँडनला झोपेत असताना गोळ्या का घातल्या याविषयी अधिकाऱ्यांना सविस्तर सांगितले. मुलाने सांगितले की, तो आजोबांना भेटण्यासाठी जेआरव्ही पार्कमध्ये गेला होता. यादरम्यान त्याने त्यांच्या ट्रकच्या ग्लोव्ह बॉक्समध्ये ठेवलेले पिस्तूल चोरली. या चोरलेल्या पिस्तुलीने त्याने ब्रँडनचा जीव घेतला. ब्रँडनची हत्या केल्यानंतर त्याने पिस्तूल परत ट्रकमध्ये ठेवल्याचेही कबुल केले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे आरोपी मुलाने ब्रँडनला यापूर्वी कधीही पाहिले नव्हते. त्याचबरोबर त्याची हत्या करण्याचे कोणतेही कारण नव्हते. गोळी झाडून आरोपी मुलाने ब्रँडनचा जीव घेतला. सध्या मुलाचे मनोरुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com