China Spy Balloon
China Spy BalloonDainik Gomantak

China Spy Balloon: अमेरिकेचे दहा फुगे चीनच्या हद्दीत

अमेरिकेने जानेवारी 2022 पासून दहापेक्षा जास्त फुगे आमच्या हवाई हद्दीत सोडल्याचा आरोप चीनने सोमवारी केला आहे.
Published on

China Spy Balloon: हेरगिरी करणारा चीनचा फुगा अमेरिकेने नष्ट केल्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव ताणले गेले आहेत. चीनने उलटवार करीत यात भरच घातली आहे. ‘अमेरिकेने जानेवारी 2022 पासून दहापेक्षा जास्त फुगे आमच्या हवाई हद्दीत सोडल्याचा आरोप चीनने सोमवारी केला आहे.

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वँग वेनबिन पत्रकारांशी बोलताना म्हणाले की जानेवारी 2022 पासून अमेरिकेने आमच्या हद्दीत दहापेक्षा जास्त फुगे पाठविले आहेत. दुसऱ्या देशांच्या हवाई हद्दीत अवैधपणे प्रवेश करणे यात असामान्य असे काही नाही,

विशेषतः अमेरिकेसाठी तर नाहीच. चिनी अधिकाऱ्यांची कोणतीही परवानगी न घेता अमेरिकेचे फुगे किमान दहा वेळा तरी चीनच्या हवाई हद्दीत उडत असल्याचे दिसले आहे, असा आरोप त्यांनी केला.

China Spy Balloon
Pakistan Economic Crisis: दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर PAK, जनक्षोभ; चिकन-800 टोमॅटो-200 ₹ एक किलो

अशा बेकायदा घुसखोरीवर चीनने काय कारवाई केली, असे विचारले असता ‘‘अशा घटना चीनने जबाबदारीने आणि व्यावसायिक पद्धतीने हाताळल्या आहेत.

जर तुम्हाला अमेरिकेचे अति उंचावरील फुगे बेकायदा चीनच्या हवाई क्षेत्रात घुसल्याबाबत तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही अमेरिकेकडे संपर्क साधावा, असा सल्ला मी देईन,’’ असे वँग पत्रकारांना उद्देशून म्हणाले.

अमेरिकेच्या हवाई हद्दीत घुसलेला चिनी हेरगिरी फुगा नष्ट केल्यानंतर सध्या दोन्ही देशांमधील संबंध बिघडले आहेत. हा फुगा चीनने हेरगिरीसाठी पाठविलेला होता असा आरोप अमेरिकेने केला तर फुग्याचा हेतू नागरी हितासाठी होता, असा दावा चीनने केला आहे.

अमेरिकेसह, कॅनडानेही त्यांच्या हद्दीत छुप्याने घुसलेले अजून काही फुगे पाडले आहेत. त्यातील पहिला फुगा चीनचा असल्याचे मान्य केले आहे.

China Spy Balloon
Hindu Lady Commissioner in Pakistan: पाकिस्तानात 'या' हिंदू महिलेची का होतेय चर्चा? वाचा नेमके प्रकरण...

अमेरिकेने पाडली तिसरी अज्ञात वस्तू

अमेरिकेने त्यांच्या हवाई क्षेत्रात उडणारे तिसरी अज्ञात वस्तू रविवारी पाडली. मिशिगन राज्यातील लेक हरॉनवरील हवाई हद्दीत ही वस्तू 20 हजार फुटांवरून उडत होती. ही माहिती अमेरिकेचा संरक्षण विभाग पेंटागॉनचे माध्यम सचिव ब्रिगेडियर जनरल पॅट रायडर यांनी दिली.

अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या आदेशानुसार ‘एफ-16’ या लढाऊ विमानातून ‘एआयएम9एक्स’ हे क्षेपणास्त्र डागून ही वस्तू नष्ट करण्यात आली. काल कॅनडात उडत असलेली अशाच प्रकारची दंडगोलाकार वस्तू नष्ट करण्यात आली होती.

पहिला फुगा चीनने हेरगिरीसाठी पाठविला होता, असा आरोप अमेरिकेने केला असला तरी अन्य अज्ञात वस्तूंची ओळख उघड केलेली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com