Ganesh Chaturthi : पणजीत माटोळी बाजारात खरेदीसाठी झुंबड

वाहतूक खर्च वाढल्याने काही वस्तूंमध्ये पाच-दहा रुपयांची वाढ; खरेदीसाठी नागरिकांचा उत्साह कायम
Panjim Matoli Market
Panjim Matoli Market Dainik Gomantak

Ganesh Chaturthi : महापालिकेतर्फे बाजारातील वाहनतळावर दरवर्षीप्रमाणे भरविण्यात येणाऱ्या माटोळी बाजारात साहित्य दाखल होताच त्या खरेदीला नागरिकांनी सुरुवात केली. रविवार असल्याने अष्टमीच्या फेरीत खरेदीला आलेल्या नागरिकांनी माटोळीला लागणाऱ्या साहित्य खरेदीतही रस दाखविल्याचे चित्र दिसत होते. वाहतूक खर्च वाढल्याने या वस्तूंच्या दरातही काहीशी वाढ केल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

माटोळीसाठी निसर्गातील विविध फळफळावळ, त्याशिवाय जंगलातील काही वेगवेगळी फुले, विविध वनस्पती विक्रीसाठी ग्रामीण भागातील लोक शहरात घेऊन येतात. सालाबादप्रमाणे पणजी महापालिकेने माटोळी बाजार बाजारातील वाहनतळावर भरविला आहे. दुकानांची शनिवारी आखणी झाल्यामुळे इच्छुक विक्रेत्यांनी रविवारी सकाळीच दुकाने थाटण्यास सुरुवात केली. दुकाने थाटण्याचे काम सुरू असतानाच अनेक नागरिक माटोळीचे साहित्य खरेदी करीत होते. दुपारपर्यंत अनेक विक्रेत्यांकडून साहित्य आणण्याचे काम सुरूच होते.

Panjim Matoli Market
Ganesh Chaturthi: डिचोलीत गणेशमूर्तींवर फिरतोय कलाकारांचा अखेरचा हात

28 पासून माटोळी बाजार सुरू होणार असल्याचे जाहीर केले असले तरी रविवारीच नागरिकांकडून खरेदीला सुरुवात झाल्याने बाजार सुरू होण्याचे केवळ औपचारिकता राहिली असे दिसते. माटोळी बाजारात शिवोली, खोर्ली, डोंगरी अशा ठिकाणाहून विक्रेते साहित्य विक्रीसाठी घेऊन आले आहेत.

साहित्यात विविधता

वाहतूक खर्च वाढल्याने काही वस्तूंमध्ये पाच-दहा रुपयांची वाढ केल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली. सुपारी, केळीचे घड, केळीचे फूल, काकडी, अननस, नारळ, विविध फुले, पिकावरील मसाल्याच्या माळाही बाजारात दिसून येत होत्या. अनेक विक्रेत्यांनी विविध प्रकारचे साहित्य विक्रीस आणले आहे. येत्या दोन दिवसात आणखी साहित्य उपलब्ध होणार आहे, असे विक्रेत्यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com