Ghumat Aarti|गोव्याच्या संस्कृतीची ओळख असणारे 'घुमट वाद्य' असे होते तयार

घुमट हे वाद्य ‘गोमंतकीय’ आहे आणि ‘घुमट आरती’ हे गोव्याचं एक खास वैशिष्टय आहे.
Ghumat in Goa
Ghumat in GoaDainik Gomantak
Published on
Updated on

घुमट हे वाद्य ‘गोमंतकीय’ आहे आणि ‘घुमट आरती’ हे गोव्याचं एक खास वैशिष्टय आहे. चतुर्थीच्या दिवसात ‘घुमट वादनाला एक ग्लॅमर येतो. मात्र, अशा स्वामित्व हक्काच्या जाणिवेतून घुमट आपण आपल्याला हव्या तशा ‘तालात’ वाजवू शकतो अशाप्रकारचा समज फैलावत चालला आहे.

('Ghummat Instrument' identity of Goa's culture)

Ghumat in Goa
Goa Ganesh Chaturthi: गोव्यात बाप्पांचे जल्लोषात स्वागत!

मात्र घुमट हे वाद्यदेखील इतर वाद्यांप्रमाणेच शास्त्रशुध्द पद्धतीनं वाजवायचं असतं आणि ते तसं वाजवण्यासाठी ते शिकून घेण्याचीही गरज असते. ‘घुमट’ वाद्याचा अभ्यास केलेले आणि त्यावर चढवण्यात येणाऱ्या चामड्यासंबंधात नवीन तंत्र शोधून काढण्यासाठी विशेष प्रयास करणारे संगीत शिक्षक विनायक आखाडकर यांची खंत हिच आहे की, घुमटाच्या लोकप्रियतेमुळे आणि ते वाजवायच्या अनियंत्रित हव्यासामुळे घुमटवादनाची शास्त्रशुद्‌धता आजकाल हरवत चालली आहे आणि घुमट वादन आपली लयबद्‌धता हरवून कर्कश बनत चालले आहे.

घुमट वाद्याशी ओळख

‘‘घुमटाची ‘घुमी’ म्हणजे घुमटामधून निघणारा अनुनाद (रेझोनान्स) हा त्याच्यावर पडणाऱ्या थापेमुळे लपता कामा नये. त्या ‘घुमी’मध्येही स्वरांची साथ करण्याची क्षमता असायला हवी. विविध बोलांसाठी घुमटाच्या विशिष्ट भागावर विशिष्ट तऱ्हेने बोट यायला हवे आणि वाद्यांवर होणाऱ्या आघातांच्या तारतेमधूनही (वोल्युम) आरतीचे शब्द नीट ऐकू आलेच पाहिजेत. घुमट वादनात तीन वाद्ये वापरली जातात. घुमट, समेळ आणि कासाळे. या तीनही वाद्यांमधला समतोल, चालीची लयकारी सांभाळणारा असला पाहिजे.

इतर कुठल्याही सांगितिक रिवाजाप्रमाणेच घुमट आरतीतही विलंबित, मध्य आणि द्रूत अशी लयगती असायलाच हवी’’. ‘घुमट आरती परिचय’ हे पुस्तक लिहिणारे विनायक आखाडकार, घुमट आरती संबंदाने आपले वरील विचार तिव्रतेने मांडत होते.

कसे बनते घुमट वाद्य

पूर्वी घुमटासाठी घोरपडीच्या चामड्याचा वापर होत होता. मात्र घोरपडीच्या चामड्यावर जेव्हा बंदी आली तेव्हा आखाडकर यांनी बकरीच्या चामड्यावर प्रयोग करुन पाहिला, बकरीच्या विशिष्ट भागाचे पातळ चामडे मिळवून, नंतर ते चोवीस तास भिजवून आठ दिवस सावलीत सुकवून वगैरे घुमटाच्या मूळ नादाकडे साम्य असणारा आवाज मिळवला होता. तेव्हा त्यांचे फार कौतुकही झाले होते घुमट हे ‘रणवाद्य’ नसून देवाची आराधना करण्यासाठी वापरले जाणारे वाद्य आहे हे वाजवण्यांनी लक्षात घ्यायला हवे. घुमटवादनात शक्तीची नव्हे तर युक्तीची गरज असते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com