Ponda Bazaar
Ponda BazaarDainik Gomantak

Goa Ganesh Chaturthi: 'चतुर्थीच्‍या' बाजारामुळे फोंड्यात वाहतूक कोंडी

Goa Ganesh Chaturthi: फोंड्याच्या मुख्य रस्त्यावर आज शनिवारपासून गणेश चतुर्थीचा माटोळीचा बाजार सुरू झाला आहे
Published on

Ponda: फोंड्याच्या मुख्य रस्त्यावर आज शनिवारपासून गणेश चतुर्थीचा माटोळीचा बाजार सुरू झाला. मात्र त्‍यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे. आधीच हा वर्दळीचा रस्ता म्हणून गणला जातो. त्यात परत या रस्त्यावर गोवा बागायतदारसारखी संस्था असल्यामुळे तिथे अधिकच गर्दी होते.

शिवाय वाहतुकीसाठी हा रस्ता बंद केल्यामुळे पंडितवाडा येथून वाहतूक वळविण्यात आल्यामुळे फोंड्याच्या वाहतुकीत खंड पडताना दिसत आहे. उसगाव बाजूला जाणाऱ्या बसेस तेथून जात असल्यामुळे तिथे आज वाहनांच्‍या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसत होत्या. त्यामुळे वरच्या बाजारातून खाली बसस्‍थानकापर्यंत येण्‍यास वाहनांना अर्धा तास लागत होता.

Ponda Bazaar
Ayodhyas Ram Temple Photo: महाराष्ट्र अन् दिल्लीतही अयोध्येचे भव्य राम मंदिर

विशेष म्हणजे चतुर्थीनिमित्त आयोजित केलेला स्वयंसहाय्य गटाचा चतुर्थी बाजार हा या बाजाराच्या मागे भरविल्यामुळे तिथे ग्राहकांचा शुकशुकाट दिसत होता. या बाजारात खास करून महिलांच्या स्वयंसहाय्य गटांनी भाग घेतलेला आहे. अशा प्रकारचा फोंड्यात तरी हा पहिलाच उपक्रम आहे. हा बाजार गेल्‍या चार-पाच दिवसांपासून कार्यरत आहे. पण माटोळीचा बाजार एकीकडे आणि स्वयंपूर्ण साहाय्य बाजार दुसरीकडे असे चित्र असल्यामुळे तिथे ग्राहकांनी पाठ फिरविल्याचे दिसतेय. या बाजारात अनेक स्वयंसाहाय्य गटांचा समावेश असल्‍यामुळे त्‍यास चांगला प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा होती, मात्र सध्‍या तरी ती फोल ठरली आहे.

Ponda Bazaar
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोल माफी; पोलिस व परिवहन विभागाकडे पासेस, स्टिकर्स उपलब्ध

* राम कुंकळकर, अध्यक्ष फोंडा विकास समिती-

स्वयंसाहाय्‍य गटाचा बाजार एकीकडे आणि माटोळीचा बाजार दुसरीकडे नको होता. वाहतूक आणि इतर समस्यांचा विचार करता हे दोन्‍ही बाजार जवळजवळ असणे गरजेचे होते, जेणेकरून ग्राहकांना एकाच वेळी एकाच ठिकाणी दोन्ही प्रकारची खरेदी करता आली असती. तसेच स्वंयसाहाय्‍य गटांनाही फायदा झाला असत

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com