Zika Virus in Karnataka: कर्नाटकात झिका व्हायरसची एन्ट्री; आरोग्य विभाग अलर्ट मोडवर

झिका व्हायरसची एन्ट्री झाल्याने आरोग्य विभाग अॅक्शन मोडमध्ये आले आहे.
Zika Virus in Karnataka
Zika Virus in KarnatakaDainik Gomantak
Published on
Updated on

देशात कोरोना विषाणूने (Corona Virus) थैमाण घातल्यानंतर आता झिका व्हायरसने सरकारची चिंता वाढवली आहे. पुण्यानंतर आता कर्नाटकात झिका विषाणूची एन्ट्री झाली आहे. कर्नाटकचे आरोग्यमंत्री के. सुधाकर यांनी सोमवारी सांगितले की, रायचूर जिल्ह्यातील पाच वर्षांच्या मुलीमध्ये हा विषाणू आढळला आहे. झिका विषाणूची (Zika Virus) राज्यातील ही पहिलीच घटना आहे. मात्र, कोणत्याही प्रकारची काळजी करण्याची गरज नसल्याचेही मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. कारण सरकार आवश्यक त्या सर्व उपाययोजना करत असून लवकरच याबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी करणार आहेत.

सुधाकर म्हणाले पुण्याच्या लॅबमधून आम्हाला मिळालेल्या अहवालात झिका व्हायरसची पुष्टी झाली आहे. 5 डिसेंबर रोजी येथून हा नमुना पाठवण्यात आला. यासोबतच आणखी 2 नमुने पाठवण्यात आले. इतर दोघांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. ते म्हणाले, 'जिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे ती पाच वर्षांची मुलगी आहे. सध्या आरोग्य विभाग मुलींवर लक्ष ठेवून आहे. काही महिन्यांपूर्वी केरळ, महाराष्ट्र (Maharashtra) आणि उत्तर प्रदेशमध्ये झिका विषाणूचे रुग्ण आढळले होते.

Zika Virus in Karnataka
भाऊ, भाई आणि जॅक सिक्वेरा वादात 'मनोहर' नाव फायनल! तरीही पर्रीकरांचं नाव दिल्याने का होतोय वाद?

आरोग्यमंत्र्यांनी सांगितले की, सरकार अर्लट मोडवर आले असून रायचूर आणि शेजारील जिल्ह्यांतील आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच कोणत्याही रुग्णालयात संशयित संसर्गाची प्रकरणे आढळल्यास झिका विषाणू चाचणीसाठी नमुने पाठविण्यास सांगितले आहे. सध्या ज्या मुलीमध्ये या विषाणूची लागण झाली आहे, तिचा कोणताही प्रवास इतिहास नाही. आतापर्यंत या विषाणूची ही एकच केस आहे. ती प्राप्त होताच काळजी घेण्यात येत आहे.

  • झिका व्हायरस म्हणजे काय?

झिका विषाणू हा डासांमुळे पसरणारा आजार आहे. हा रोग एडिस डासाच्या चाव्यानेच पसरतो. हे डास दिवसा जास्त सक्रिय असतात.

  • झिका व्हायरसची लक्षणं

    ताप, सांधेदुखी, अंगदुखी, डोकेदुखी, डोळे लाल होणे, उलटी होणे, अस्वस्थता जाणवणे ताप, अंगावर पुरळ उठणे अशी लक्षणे आढळतात. झिका आणि इतर कीटकजन्य आजारांसाठी सर्वेक्षण सक्षम करत असतानाच कोरोना सर्वेक्षण आणि लसीकरण याकडे दुर्लक्ष होणार नाही, याबाबत दक्षता घेण्याबाबत सर्व संबंधितांना आरोग्य विभागाने निर्देश दिले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com