Cyber Crime: अनोळखी नंबरवरून मेसेज आला आणि 6 लाख घेऊन गेला; पार्ट टाइम नोकरीने तरुण झाला कंगाल

Cyber Crime: पार्ट टाइम नोकरीच्या वर्क प्रोफाईलमध्ये, हे अतिशय सोपे काम असल्याचे सांगितले होते. यामध्ये यूजर्सना युट्युबचे व्हिडिओ लाईक करावे लागले. प्रत्येक लाइकसाठी, एक टास्क पूर्ण व्हायचे आणि प्रत्येक टास्कसाठी पैसे मिळायचे.
Youth from Gujarat has become a victim of cyber fraud, lost 6.12 lakhs of his hard work to fraudsters.
Youth from Gujarat has become a victim of cyber fraud, lost 6.12 lakhs of his hard work to fraudsters.Dainik Gomantak
Published on
Updated on

Youth from Gujarat has become a victim of cyber fraud, lost 6.12 lakhs of his hard work to fraudsters:

सायबर फसवणुकीची रोज नवीन प्रकरणे समोर येत आहेत. गुजरातमधून असेच एक नवीन प्रकरण समोर आले आहे, जिथे एका व्यक्तीची 1-2 लाख रुपयांची नव्हे तर एकूण 6.12 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.

गुजरातचा ३६ वर्षीय दीपक सायबर फसवणुकीचा बळी ठरला आहे. या फसवणुकीत त्याच्या कष्टाचे 6.12 लाख रुपये वाया गेले आहेत. पीडित तरुणाने सायबर क्राईम पोलिसात तक्रार दाखल केली असून, यात पीडित तरुणाने सांगितले आहे की, एका अनोळखी नंबरवरून व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज आल्याने तो लोभाच्या जाळ्यात अडकला.

पीडितेला व्हॉट्सअ‍ॅपवरून एक मेसेज आला, ज्यामध्ये त्याला अर्धवेळ नोकरीची ऑफर देण्यात आली होती. या अर्धवेळ नोकरीमध्ये यूजर्सना सहज कमाई करण्याची संधी मिळत होती.

अर्धवेळ नोकरीच्या वर्क प्रोफाईलमध्ये, वापरकर्त्यांना हे अतिशय सोपे काम असल्याचे सांगितले होते. यामध्ये यूजर्सना युट्युबचे व्हिडिओ लाईक करावे लागायचे. प्रत्येक लाइकसाठी, एक टास्क पूर्ण व्हायचा आणि प्रत्येक टास्कसाठी पैसे मिळायचे.

Youth from Gujarat has become a victim of cyber fraud, lost 6.12 lakhs of his hard work to fraudsters.
Tricolour: तिरंग्यापेक्षा उंच फडकवला धार्मिक ध्वज, गुन्हा दाखल झाल्याने आरोपी फरार

तीन आठवडे चाललेल्या या घोटाळ्यात पीडित तरुणाने त्याच्या खात्यातून ६.१२ लाख रुपये ट्रान्सफर केले. यानंतर त्याने टास्कमधून बोनस जिंकले आणि जेव्हा तरुणाने त्याच्या बँकेत पैसे हस्तांतरित करण्यास सांगितले, तेव्हा सायबर चोरटे पसार झाले.

यानंतर आपण सायबर फसवणुकीला बळी पडल्याचे पीडितेच्या लक्षात आले. तरुणाने पोलिसांना या संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली. पोलीस आता या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com