Nalanda Train Video: 440 व्हॉल्टची सेल्फी, सोळा वर्षांचा मुलगा रेल्वे बोगीवर चढला अन् जळून खाक झाला

रेल्वेच्या वर असलेल्या विद्युत तारेच्या संपर्कात आल्याने एका युवकाचा मृत्यू झाला. बिहारमध्ये मालगाडीच्या सुमारे 12 बोगी रुळावरून घसरल्या होत्या.
Nalanda Train Derail Video
Nalanda Train Derail VideoDainik Gomantak
Published on
Updated on

नालंदा : बुधवारी संध्याकाळी एकंगरसराय रेल्वे स्थानकाजवळ मालगाडीच्या सुमारे 12 बोगी रुळावरून घसरल्या. या अपघातात आठ बोगींचे पूर्ण नुकसान झाले. या घटनेनंतर आजूबाजूच्या लोकांमध्ये मोठ्या आवाजाने एकच खळबळ उडाली. घटनेनंतर आजूबाजूला लोकांची गर्दी झाली. यात तरुण-तरुणींचीही मोठी संख्या होती. यादरम्यान काही लोक मालगाडीच्या पडक्या डब्यावर चढले आणि सेल्फी काढू लागले. त्यात रेल्वेच्या वर असलेल्या विद्युत तारेच्या संपर्कात आल्याने एका युवकाचा मृत्यू झाला. त्याचा लाइव्ह व्हिडिओ आला आहे, जो पाहून अंगावर काटा येतो.

Nalanda Train Derail Video
Vice President Election: मार्गारेट अल्वा यांना आप अन् JMM ने दिला पाठिंबा, मात्र...

लाइव्ह व्हिडिओमध्ये हे स्पष्टपणे दिसत आहे की, अचानक वायरच्या संपर्कात आल्याने आग लागते आणि मग मोठा आवाज येतो. कोसियावा गावातील रहिवासी 16 वर्षीय सूरज कुमार असे मृत युवकाचे नाव आहे. किशोर एक विद्यार्थी होता. रेल्वे अपघातानंतर तो त्याच्या काही मित्रांसोबत सेल्फी घेण्यासाठी गेला होता. या घटनेत एक तरुण गंभीर जखमी होऊन खाली पडला. त्याला तातडीने खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आणि त्यानंतर चांगल्या उपचारांसाठी पाटणा येथे हलवण्यात आले.

घटनेनंतर चेंगराचेंगरी

या घटनेनंतर घटनास्थळी उपस्थित नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. अनेक जण पळून जाण्याच्या प्रयत्नात पडले. चेंगराचेंगरीमुळे काही जणांना किरकोळ दुखापतही झाली. घटनास्थळी उपस्थित लोकांनी मालगाडीच्या डब्यावर चढून मृतदेह बाहेर काढला. यानंतर पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी सदर रुग्णालयात पाठवला. या घटनेनंतर कुटुंबीयांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

Nalanda Train Derail Video
'Mahatma Gandhi 140 कोटी जनतेचे राष्ट्रपिता', अखेर गुजरात सरकारने उच्च न्यायालयात असे का म्हटले?

एकंगरसरायचे एसएचओ संतोष कुमार यांनी सांगितले की, मालगाडीचा अपघात झाल्यानंतर पोलीस तेथे पोहोचले होते. काही लोक मालगाडीवर चढून सेल्फी घेत होते. त्यात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. सदर रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. तर एका तरुणावर पाटण्यात उपचार सुरू आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com