देशात लोकसभा आणि विधानसभेच्या पोटनिवडणुका पार पडल्या. यातच आता कर्नाटकात विधानसभा पोटनिवडणुकांत मुख्यमंत्री बोम्मई (Chief Minister Basavaraj Bommai) यांना त्यांच्याच जिल्ह्यामध्ये मोठा झटका बसला आहे. हनगळमध्ये कॉंग्रेसने बाजी मारली आहे. बसवराज बोम्मई कर्नाटकचे मुख्यमंत्री झाल्यानंतर राज्यात झालेली ही पहिलीच निवडणुक असल्याने विरोधकांनी त्यांना चांगलच लक्ष केले. याच पाश्वभूमीवर आता राज्याचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा (Former Chief Minister B. S. Yeddyurappa) हे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या मदतीसाठी धावून आले असल्याचे सांगण्यात येत आहे. राज्यातील सिंदगी (Sindagi) आणि हनगळ विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुक पार पडली. यामध्ये हनगळची जागा भाजपकडे तर सिंदगीच्या जागेवर धर्मनिरपेक्ष दलाने आपले वर्चस्व स्थापन केले.
दरम्यान, आमदार सी.एम. उदासी यांचा दुर्देवी मृत्यू झाल्यानंतर हनगळची जागा रिक्त झाली होती. तर जेडीेसचे एम. सी. मनगुळी यांच्या निधनाने सिंदगीची जागा रिक्त झाली होती. या जागांसाठी राज्यातील भाजप, कॉंग्रेस आणि जेडीएसने चांगलाच जोर लावला होता. पुढच्या वर्षी राज्यात विधानसभा निवडणुका होत असल्याने मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यासाठी ही पोटनिवडणुक महत्त्वाची होती. परंतु त्यांना या निवडणुकीत मोठा फटका बसला असल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे हनगळ हा मतदारसंघ सध्याचे मुख्यमंत्री बोम्मई यांच्या जिल्ह्यामधील असल्याने हा पराभव मुख्यमंत्र्यांचाच असल्याचे सांगण्यात येत आहे. या मतदारसंघामधून कॉंग्रेसचे श्रीनिवास माने हे मोठ्या मताधिक्याने निवडूण आले आहेत. यात भाजप दुसऱ्या क्रमांकावर असून तर जेडीएसने तिसरे स्थान राखले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.