Year Ender 2023: लालूंच्या सुपुत्राच्या स्वप्नात 'श्रीकृष्ण', तर राहुल गांधींचा PM मोदींवर निशाणा; दिग्गज नेत्यांना...

Rahul Gandhi: काँग्रेस नेते राहुल गांधी यांना कोण ओळखत नाही? काँग्रेस पक्षाचे अनेक नेते आणि कार्यकर्ते त्यांना भावी पंतप्रधान म्हणून पाहतात.
Rahul Gandhi & Nitish Kumar &  Tej Pratap Yadav
Rahul Gandhi & Nitish Kumar & Tej Pratap YadavDainik Gomantak
Published on
Updated on

Year Ender 2023: देशात असे एकापेक्षा एक दिग्गज नेते आहेत, जे आपल्या वक्तव्यामुळे तर कधी आपल्या कार्यामुळे संपूर्ण देशात चर्चेचा विषय ठरले, मग ते पंतप्रधान नरेंद्र मोदी असोत किंवा त्यांचे मंत्री नितीन गडकरी. सध्या नितीन गडकरी केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री आहेत. व्यक्ती म्हणून त्यांची जशी चर्चा होते, तशीच त्यांच्या कामाची देखील सर्वसामान्यांमध्ये चर्चा होते. त्याचवेळी, पंतप्रधान मोदींची देशातच नव्हे तर जगभरात चर्चा होत आहे. पण आज आम्ही तुम्हाला अशा काही नेत्यांबद्दल सांगणार आहोत जे या वर्षभरात खूप चर्चेत राहिले, पण काही कारणांमुळे लोकांनी त्यांना खूप ट्रोल केले.

दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांना कोण ओळखत नाही? काँग्रेस पक्षाचे अनेक नेते आणि कार्यकर्ते त्यांना भावी पंतप्रधान म्हणून पाहतात. या वर्षात राहुल खूप चर्चेत राहिले, मग ते 'मोदी आडनाव' बदनामी प्रकरण असो किंवा रोजगार, महागाई आणि अग्निपथ योजनेवर राहुल गांधींची नाराजी असो. याशिवाय, त्यांच्या काही वक्तव्यांमुळे आणि कृतीमुळेही ते ट्रोल झाले. काही महिन्यांपूर्वी त्यांनी दिल्लीतील आनंद विहार रेल्वे स्थानकावर जाऊन कुलींची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी कुलीप्रमाणे डोक्यावर ट्रॉली बॅगही घेतली, मात्र यामुळे त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागला. लोक म्हणू लागले की ट्रॉली बॅगला चाके होती तर ती डोक्यावर का घेतली?

Rahul Gandhi & Nitish Kumar &  Tej Pratap Yadav
Rahul Gandhi: 'केंद्रात नरेंद्र मोदींचा पराभव करायचा असेल तर केसीआर...', राहुल गांधींचा तेलंगणात हल्लाबोल!

नितीश कुमार

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची गणना देशातील सर्वात यशस्वी नेत्यांमध्ये केली जाते. ते अनेकवेळा राज्याचे मुख्यमंत्री राहिले आहेत आणि आजही त्याच पदावर कार्यरत आहेत. अलीकडेच बिहार विधानसभेत लोकसंख्या नियंत्रणावर बोलताना त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे त्यांना खूप ट्रोल करण्यात आले होते. त्यानंतर ते आपल्या वक्तव्यासंबंधी सारवासारव करताना दिसले. स्पष्टीकरण देताना ते म्हणाले की, लोकांनी त्यांना 'अश्लील नेता' देखील म्हटले. काही लोकांनी त्यांना ट्रोल करत त्यांचे शब्द अश्लाघ्य असल्याचे म्हटले तर काहींनी याला महिलांचा अपमान असल्याचे म्हटले. लोकांकडून ट्रोल झाल्यानंतर अखेर त्यांना मीडियासमोर माफी मागावी लागली.

शशी थरुर

काँग्रेस नेते शशी थरुर हे देशातील सर्वात शिक्षित नेत्यांपैकी एक मानले जातात, ज्यांच्या इंग्रजीची नेहमीच चर्चा होते. मात्र, त्यांच्या इंग्रजीची जितकी चर्चा होते, तितकीच ते महिलांसोबतच्या फोटोंमुळे चर्चेत राहतात. यावरुन काही लोकांनी त्यांना खूप ट्रोलही केले. या वर्षी 5 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ यांचे निधन झाले, ज्यावर शशी थरुर यांनी असे ट्विट केले होते. त्यानंतर त्यांना लोकांनी सोशल मीडियावर ट्रोल करण्यास सुरुवात केली होती. मुशर्रफ यांच्या निधनावर शोक व्यक्त करताना ते म्हणाले होते की, त्यांनी 2002 ते 2007 दरम्यान भारतासोबत शांततेसाठी काम केले होते. या ट्विटवर ट्रोल झाल्यानंतर त्यांनी आणखी एक ट्विट करुन संपूर्ण प्रकरणाचा खुलासा केला होता.

Rahul Gandhi & Nitish Kumar &  Tej Pratap Yadav
Rahul Gandhi: 'आम्ही घाबरत नाही,' फोन टॅपिंगच्या प्रकरणावर राहुल गांधींचा एल्गार

अखिलेश यादव

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनाही यावर्षी खूप ट्रोल करण्यात आले. काही महिन्यांपूर्वी त्यांनी सोशल मीडियावर बैलांच्या लढाईचा व्हिडिओ शेअर केला होता, ज्यानंतर लोकांनी त्यांना खूप ट्रोल केले होते. लोकांनी त्यांना राज्यावर लक्ष केंद्रित करायाचा सल्ला दिला.

तेज प्रताप यादव

लालूंचे पुत्र आणि बिहार सरकारमधील पर्यावरण मंत्री तेज प्रताप यादव यांची तुम्हाला माहिती असेलच. त्यांचे लक्ष राजकारणापेक्षा भक्तीवर जास्त असते आणि त्यामुळे त्यांना अनेकदा ट्रोल केले जाते. यावर्षी मार्चमध्ये, त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आणि लोकांना त्यांचे स्वप्नाबद्दल सांगितले. व्हिडीओच्या माध्यमातून त्यांनी सांगितले होते की, त्यांच्या स्वप्नात भगवान श्रीकृष्णाने त्यांना दर्शन दिले होते, त्यानंतर ते जागे झाले. या व्हिडिओवरुन लोकांनी त्यांना खूप ट्रोल केले. तेज प्रताप यादव यांना ऑस्कर अवॉर्ड मिळावा, असे कोणी गंमतीने बोलले होते, तर कोणी म्हटले होते की, हा व्हिडिओ पाहून मी यापूर्वी कधीही हसलो नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com