क्रिकेट विश्वात खळबळ! लैंगिक शोषणाचे आरोप ठरले खरे; भारताच्या 'या' स्टार खेळाडूवर अटकेची टांगती तलवार

Yash Dayal Sexual Harassment Chargesheet: भारतीय क्रिकेटपटू यश दयाल याच्यावर लागलेल्या लैंगिक छळाच्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आहे.
Yash Dayal Sexual Harassment Chargesheet
Yash Dayal Sexual Harassment ChargesheetDainik Gomantak
Published on
Updated on

गाझियाबाद: भारतीय क्रिकेटपटू यश दयाल याच्यावर लागलेल्या लैंगिक छळाच्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आहे. गाझियाबाद पोलिसांनी या प्रकरणात न्यायालयात १४ पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. पोलिसांच्या तपासात यश दयालवर लागलेले लैंगिक छळाचे आरोप सत्य असल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपपत्रात पोलिसांनी हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज आणि रेकॉर्ड्स हे महत्त्वाचे पुरावे म्हणून समाविष्ट केले आहेत.

२१ जून रोजी गाझियाबादच्या इंदिरापुरम परिसरात राहणाऱ्या एका तरुणीने मुख्यमंत्री पोर्टलवर तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत तिने यश दयालवर लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा गंभीर आरोप केला होता. तिने आपल्या न्यायासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ (माजी ट्विटर) वरही सार्वजनिक अपील केले होते.

यानंतर, २४ जून रोजी इंदिरापुरम पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला. २७ जून रोजी पीडितेचा सविस्तर जबाब नोंदवून तपासाला सुरुवात झाली. तपासादरम्यान पोलिसांना बलात्काराशी संबंधित काही ठोस पुरावे सापडले.

Yash Dayal Sexual Harassment Chargesheet
Goa Beach: गोव्यातले किनारे धोक्यात! वाळूचा वाढतोय ऱ्हास; नेदरलँड्समधील संस्थेने दिला इशारा

सुरुवातीला ही घटना इंदिरापुरम परिसरात घडल्याचे समजले होते, मात्र तपासात उघड झाले की ती घटना लिंक रोड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका हॉटेलमध्ये घडली होती. त्यामुळे पुढील तपासाची जबाबदारी लिंक रोड पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आली.

२८ जून रोजी पोलिसांनी यश दयालला तीन दिवसांच्या आत हजर राहून जबाब द्यावा अशी नोटीस पाठवली. मात्र, त्याने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर पोलिसांनी दुसरी नोटीस पाठवली. अखेर यश दयालने डीसीपी ट्रान्स हिंडन यांच्या कार्यालयात जाऊन आपला जबाब नोंदवला.

Yash Dayal Sexual Harassment Chargesheet
Goa Crime: 'हॅलेलूया' म्हणणे नडले! हणजूण 'संडे मास'शी टेक्नो पार्टीची जाहिरात जोडणाऱ्यावर गुन्हा दाखल

एसीपी साहिबाबाद श्वेता यादव यांनी सांगितले की, “२१ ऑगस्ट रोजी क्रिकेटपटूने डीसीपी कार्यालयात आपला जबाब दिला. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या पालकांचेही जबाब नोंदवले. पोलिस तपास पूर्ण झाल्यानंतर २७ सप्टेंबर रोजी न्यायालयात १४ पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले.”

श्वेता यादव यांनी पुढे सांगितले की, पोलिस तपासात शारीरिक संबंध प्रस्थापित झाल्याचे पुरावे मिळाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com