Killer Plant Fungus: कोलकात्यामध्ये आढळला 'प्लँट फंगस'चा जगातला पहिला रूग्ण

चक्क वनस्पतींच्या संपर्कात राहिल्याने झाला बुरशीजन्य रोग
Killer Plant Fungus
Killer Plant FungusDainik Gomantak
Published on
Updated on

Plant Fungus: संपूर्ण जग कोरोनाच्या भीतीतून अद्याप पूर्णपणे सावरलेले नसतानाच आता संसर्गजन्य रोगाचा आणखी एक प्रकार समोर आला आहे. आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे हा संसर्ग वनस्पतीपासून झाला आहे.

जगातील अशा प्रकारची पहिलीच घटना कोलकाता येथून समोर आली आहे. हा बुरशीजन्य संसर्ग घातक असल्याचे मानले जाते.

Killer Plant Fungus
Dabolim Airport: रशियन महिलेला दाबोळी विमानतळावर अटक; बनावट तिकीटाने प्रवास करण्याचा प्रयत्न

कोलकात्यातील ही 61 वर्षीय व्यक्ती वनस्पती मायकोलॉजिस्ट आहे. त्याने सतत खोकला, कर्कश आवाज, गिळण्यास त्रास होणे, घसा खवखवणे आणि सुमारे तीन महिने आळस किंवा थकवा येण्याची तक्रार केली. यानंतर तपासणीत त्यांना बुरशीजन्य आजार झाल्याचे निष्पन्न झाले.

असा संसर्ग झालेला तो जगातील पहिलाच मनुष्य आहे. वनस्पतींच्या सतत संपर्कात राहिल्यावर हे संक्रमण मानवामध्ये पसरू शकते, हे यावरून दिसून येत असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे.

मायकोलॉजिस्ट हे बुरशीवर अभ्यास करत असतात. कोलकातातील या व्यक्तीला मधुमेह, एचआयव्ही संसर्ग, किडनीशी संबंधित आजार असा कोणताही गंभीर आजार नव्हता.

मेडिकल मायकोलॉजी केस रिपोर्ट जर्नलनुसार, डॉक्टरांनी सांगितले की पीडीत व्यक्ती दीर्घकाळापासून मशरूम, बुरशीवर संशोधन करत होता. डॉक्टरांनी त्याचे एक्स-रे आणि सीटी स्कॅन केले.

छातीचा एक्स-रे नॉर्मल होता पण जेव्हा सीटी स्कॅनचा रिपोर्ट आला तेव्हा त्याच्या मानेमध्ये फोडांसारखे (पॅराट्रॅचियल ऍबसेस) काहीतरी झाल्याचे आढळून आले. हेते श्वासोच्छवासाच्या मार्गात अडथळा आणू शकते आणि घातक संसर्ग होऊ शकतो.

लवकर उपचार न मिळाल्यास त्यातून व्यक्तीचा मृत्यूही होऊ शकतो.

Killer Plant Fungus
Panaji Smart City: अरे... आम्ही तुम्हाला मते दिली, कंत्राटदारांना नाही; पणजीतील कामांवरुन उद्योजक संतापले

डॉक्टरांनी घशात साचलेला पू काढून टाकला आणि जागतिक आरोग्य संघटनेशी संबंधित बुरशी संशोधन केंद्राकडे नमुना तपासणीसाठी पाठवला. तिथे हे कॉन्ड्रोस्टेरियम पर्प्युरियम असल्याचे कळले.

त्या अहवालात म्टटले आहे की, ही एक वनस्पती बुरशी आहे ज्यामुळे वनस्पतींना सिल्व्हर लीफ रोग होतो.

या पानांचा रंग बदलतो. हे गुलाबाच्या जातींमध्ये जास्त होते. विशेष म्हणजे ही बुरशी मायक्रोस्कोपीसारख्या पारंपारिक तंत्राने ओळखता येत नव्हती. सिक्वेंसिंगमुळेच हा रोग कळू शकला.

या प्रकाराने जगभरातील शास्त्रज्ञांना संसर्गाचा प्रसार करू शकतील अशा प्रकारच्या बुरशीजन्य प्रजातींबद्दल सतर्क केले आहे. दरम्यान, संशोधकांनी सांगितले की बुरशीविरोधी औषधांमुळे संबंधित रूग्ण पूर्णपणे बरा झाला आहे. त्याचे दोन वर्षे निरीक्षण करण्यात आले आणि आता रुग्णाची तब्येत उत्तम आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com