नैसर्गिक शेतीमुळे नमामि गंगे मोहिमेला नवीन बळ मिळेल: पंतप्रधान मोदी

देशातील शेतकऱ्यांना मृदा आरोग्य पत्रिका देण्याची मोठी मोहीम राबविण्यात आली, पंतप्रधान मोदी
नैसर्गिक शेतीमुळे नमामि गंगे मोहिमेला नवीन बळ मिळेल: पंतप्रधान मोदी
ANI
Published on
Updated on

पंतप्रधान मोदींनी दिल्लीत जागतिक पर्यावरण दिनानिमित्त 'माती वाचवा चळवळ' (Save Soil Movement) कार्यक्रमात भाग घेतला होता. यावेळी लोकांना संबोधित करताना ते म्हणाले की, पर्यावरणाच्या रक्षणासाठी भारताचे प्रयत्न बहुआयामी आहेत. हवामान बदलामध्ये भारताची भूमिका नगण्य आहे. जगातील मोठे आधुनिक देश पृथ्वीवरील अधिकाधिक संसाधनांचे शोषण तर करत आहेतच, पण जास्तीत जास्त कार्बन उत्सर्जनही त्याच देशाच्या खात्यात जाते आहे. (World Environment Day)

नैसर्गिक शेतीमुळे नमामि गंगे मोहिमेला नवीन बळ मिळेल: पंतप्रधान मोदी
ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी सर्व कॅबिनेट मंत्र्यांचा घेतला राजीनामा

पंतप्रधान म्हणाले की, यावर्षीच्या अर्थसंकल्पात आम्ही ठरवले आहे की आम्ही गंगेच्या काठावर वसलेल्या गावांमध्ये नैसर्गिक शेतीला (Farmer) प्रोत्साहन देऊ, नैसर्गिक शेतीचा एक मोठा कॉरिडॉर तयार करू. यामुळे आपली शेतं केवळ रसायनमुक्त होणार नाहीत, तर नमामि गंगे मोहिमेलाही नवं बळ मिळेल.

देशातील लोक जलसंवर्धनाशी जोडले जात आहेत -

पीएम विज्ञान भवनात आयोजित या कार्यक्रमात पीएम मोदी म्हणाले की, पूर्वी आपल्या देशातील शेतकऱ्याला आपल्या शेतातली माती कोणत्या प्रकारची आहे, त्याच्या मातीत काय कमतरता आहे याची माहिती नव्हती. या समस्येवर मात करण्यासाठी देशातील शेतकऱ्यांना मृदा आरोग्य पत्रिका देण्याची मोठी मोहीम राबविण्यात आली. कॅच द रेन सारख्या मोहिमेद्वारे आम्ही देशातील जनतेला जलसंधारणाशी जोडत आहोत. या वर्षी मार्चमध्येच देशात 13 मोठ्या नद्यांच्या संवर्धनाची मोहीम सुरू झाली आहे. यामध्ये पाण्यातील प्रदूषण कमी करण्यासोबतच नद्यांच्या काठावर जंगले वसवण्याचे कामही करण्यात येत आहे.

नैसर्गिक शेतीमुळे नमामि गंगे मोहिमेला नवीन बळ मिळेल: पंतप्रधान मोदी
मोठा फेरबदल! ओडिशाच्या मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांचा राजीनामा; नवीन मंत्रिमंडळाची स्थापना होणार

आपल्याला या पाच गोष्टींवर लक्ष केंद्रित करावे लागेल

पंतप्रधान (PM Modi) म्हणाले की, माती वाचवण्यासाठी आम्ही पाच प्रमुख गोष्टींवर लक्ष केंद्रित केले आहे. प्रथम- माती रसायनमुक्त कशी करावी. दुसरा- मातीत राहणारे जीव कसे वाचवायचे, ज्याला तांत्रिक भाषेत तुम्ही Soil Organic Matter म्हणतो. तिसरे- जमिनीतील ओलावा कसा टिकवायचा, तोपर्यंत पाण्याची उपलब्धता कशी वाढवायची. चौथे, कमी भूजलामुळे जमिनीचे होणारे नुकसान कसे दूर करायचे आणि पाचवे, वनक्षेत्र कमी झाल्यामुळे जमिनीची सतत होणारी धूप कशी थांबवायची या साठी प

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com