
Indian womens team 2025 World Cup semifinals
ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका या तीन संघांनी ICC महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ च्या उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. मात्र उपांत्य फेरीसाठी अजून एक स्थान शिल्लक आहे आणि त्यासाठी चार संघांमध्ये प्रचंड स्पर्धा सुरू आहे. या चार संघांमध्ये टीम इंडिया, श्रीलंका, न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांचा समावेश आहे.
टीम इंडियाचा पुढचा मार्ग सोपा नाही. कालच श्रीलंकेने बांगलादेशवर दमदार विजय मिळवत उपांत्य फेरीच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. टीम इंडियाने आतापर्यंत या स्पर्धेत पाच सामने खेळले आहेत, त्यापैकी दोन सामने जिंकले असून तीन सामने गमावले आहेत. सध्या चार गुणांसह भारत पॉइंट टेबलमध्ये चौथ्या स्थानावर आहे.
सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी भारताला उर्वरित दोन सामने जिंकणे अनिवार्य आहे. विशेषतः भारताचा पुढचा सामना न्यूझीलंडविरुद्ध असल्याने हा सामना ‘करो किंवा मरो’ सारखा आहे. या सामन्यात विजय मिळवल्यास भारताला ६ गुण मिळतील आणि ते टॉप चार संघांमध्ये आपले स्थान निश्चित करू शकतील. शिवाय, भारताचा नेट रन रेट सध्या लक्षणीयरीत्या चांगला असल्याने हा संघासाठी मोठा फायदा ठरू शकतो.
सध्या न्यूझीलंड ४ गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. जर न्यूझीलंडने भारताला हरवल्यास त्यांच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याची शक्यता वाढेल. त्यामुळे टीम इंडियासाठी हा सामना अत्यंत निर्णायक ठरतो. पाकिस्तान आणि श्रीलंकेसाठीही उपांत्य फेरीसाठी ६ गुण मिळवणे कठीण आहे, ज्यामुळे भारताच्या विजयावरच त्यांच्या भवितव्याची साखळी अवलंबून आहे.
टीम इंडियाचा पुढचा सामना आणि त्याची तयारी, दोन्ही संघांमध्ये उपांत्य फेरीच्या मार्गावर थरार आणणारी ठरणार आहे. भारतीय चाहत्यांची नजर आता पूर्णपणे या निर्णायक सामन्यावर ठेपली आहे, कारण या विजयाशिवाय टीम इंडियाची उपांत्य फेरीत प्रवेशाची संधी धोक्यात येईल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.