Rajasthan: राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये एका महिलेला बँकेत प्रवेश करण्यापासून रोखण्यात आले होते. बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, बँकेच्या आवारात बुरखा घालण्याची परवानगी नव्हती.
सोमवारी बुरखा घातलेल्या एका महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. बुरखा घातलेली एक महिला बँकेत पोहोचली होती. यादरम्यान बँकेच्या सुरक्षा रक्षकाने महिलेला आत जाऊ देण्यास नकार दिला होता.
महिलेने बँकेत प्रवेश न देण्याचे कारण विचारले असता सुरक्षा रक्षकाने सांगितले की, बुरखा घालून बँकेत येण्यास मनाई आहे. यानंतर महिलेने ही घटना आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केली होती.
वास्तविक, बँकेतील (Bank) बुरख्याबाबतचा हा वाद जयपूरच्या जगतपूर भागातील आहे. ही घटना 28 ऑगस्ट रोजी घडल्याचे सांगण्यात येत आहे. बुरखा घातल्यामुळे तिला आत प्रवेश दिला जात नसताना महिला आणि सुरक्षा रक्षकामध्ये जोरदार वादावादी झाली.
सुरक्षा रक्षकाने स्पष्टपणे सांगितले की, येथे बुरखा घालून बॅंकेत येण्यास मनाई आहे. महिला आणि सुरक्षा रक्षक यांच्यातील वाढता वाद पाहून बँकेचे कर्मचारीही गेटवर आले. त्यानंतर महिलेने याबाबत बँक व्यवस्थापकाकडे तक्रार केली.
यानंतर बँकेच्या व्यवस्थापकाने महिलेला मोबाईल रेकॉर्डिंग करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला.
त्यावर महिलेने बँक व्यवस्थापकाला विचारले की, तिला आत येण्यापासून का रोखले जात आहे? यावर बँक व्यवस्थापकाने सांगितले की, ही दुपारच्या जेवणाची वेळ आहे. त्यामुळे तुम्ही नंतर या...
दरम्यान, बँकेतून बाहेर पडताच बँकेच्या गेटवर कुलूप लावण्यात आल्याचा आरोप महिलेने केला. जेवणाच्या वेळी बँकेच्या गेटवर कुलूप लावले जाते, असे व्यवस्थापकाकडून सांगण्यात आले.
विशेष म्हणजे, बँकेच्या इतर दोन महिला (Women) कर्मचार्यांनी व्हिडिओ दाखवला, ज्यामध्ये त्या हस्तक्षेप करताना दिसत आहेत, परंतु बुरखा घातलेल्या महिलेने बँक व्यवस्थापनावर तिला "जाणूनबुजून" बाहेर काढून टाकल्याचा आरोप केला.
तथापि, पोलिसांनी सांगितले की, संबंधित महिलेने या प्रकरणाबाबत कोणतीही पोलिस तक्रार नोंदवली नाही आणि बँकेने हे पाऊल "सुरक्षेच्या कारणास्तव" उचलले.
“आम्ही बँकेच्या व्यवस्थापकाशी बोललो…. अशी कोणतीही मार्गदर्शक तत्त्वे नाहीत. जेवणाच्या वेळेत ही महिला आत जाण्याचा प्रयत्न करत होती. सुरक्षेच्या कारणास्तव गार्डने तिला बुरखा काढण्यास सांगितले होते, असे रामनगरिया पोलिस स्टेशनचे सीआय अरुण चौधरी म्हणाले.
या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मुस्लिम संघटनेने यावर नाराजी व्यक्त केली.
मुस्लीम संघटनांचे म्हणणे आहे की, कोणत्याही कर्मचाऱ्याला बुरख्यामुळे काही समस्या असल्यास मेटल डिटेक्टर मशीन लावून तपासणी करावी. बुरखा घातलेल्या मुस्लीम महिलेशी बँकेत गैरवर्तन करण्यात आले. हे वर्तन योग्य नाही.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.