Rajasthan Crime News: राजस्थानमधील दौसा जिल्ह्यात पोलिसांनी एका लुटारु नववधूला अटक केली आहे, जी लोकांना आपल्या जाळ्यात अडकावयाची. यानंतर त्यांच्याशी ती लग्न करायची आणि लग्नानंतर 5 ते 10 दिवसातच ती दागिने आणि रोख रक्कम घेऊन पळून जायची.
या दुष्ट नववधूने तीन महिन्यांत तीन लग्न केले असून तिन्ही ठिकाणांहून फरार झाली आहे. आता दौसा पोलिसांनी नववधू सोनिया उर्फ निशा रा. यमुनानगर (हरियाणा) हिला अटक केली आहे. यासोबतच संगीता आणि अनिता नावाच्या दोन दलालांनाही अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, दौसा शहरात एका तरुणाचा दलालांच्या माध्यमातून लुटारु नववधूशी संबंध आला. यानंतर 14 जून रोजी लग्न झाले. लग्नानंतर 7 दिवसांनी म्हणजेच 21 जून रोजी ती पिहारला जाणार असल्याचे सांगून निघून गेली. नंतर परत आलीच नाही.
यानंतर तिने त्याला पैसे खात्यात टाकण्यास सांगितले. त्यानंतर पीडित व्यक्तीने कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या प्रकरणानंतर कोतवाली पोलीस (Police) ठाण्याने तपास सुरु केला असता दौसा पोलीस दलालांच्या माध्यमातून लुटारु नववधूपर्यंत पोहोचले.
यानंतर नववधू सोनिया उर्फ निशा हिला हरियाणातून ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी संगीता आणि अनिता आणि गीता या दलालांनाही अटक केली आहे.
दुसरीकडे, या संपूर्ण गॅंगमध्ये अनेक दलाल आणि मॅरेज ब्युरोचे लोक सामील आहेत, ज्यांचा पोलीस शोध घेत आहेत. लुटारु वधू सोनिया उर्फ निशा हिने नर्सिंगचे काम केले आहे. तिने प्रथम प्रेमविवाह केला होता. तिला एक मुलगीही आहे, परंतु तिने आपल्या नवऱ्याला सोडले.
यानंतर दलालांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांनी तिला लुटारु नववधू बनवून व्यवसाय सुरु केला. आरोपी सोनिया ही मे महिन्यात भिलवाडा येथे लग्न (Marriage) करुन फरार झाली होती. जून महिन्यात दौसा येथे लग्नानंतर ती रोख रक्कम आणि दागिने घेऊन फरार झाली होती.
जुलै महिन्यात पानिपतमध्ये सोनियाने लग्न केले आणि त्यानंतर तेथूनही ती निघून गेली. दरम्यान, दौसा पोलिसांनी हरियाणा गाठून तिला अटक केली. सध्या पोलीस सोनिया आणि दोन्ही दलालांची चौकशी करत आहेत, जेणेकरुन इतर घटनांसोबत या गॅंगसोबत संबंधित इतर लोकांनाही अटक करता येईल.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.