बिहारमधील मोतिहारी येथे एका महिलेच्या हत्येप्रकरणी तिचा पती तुरुंगात शिक्षा भोगत होता, त्याचे सत्य समोर आले तेव्हा लोकांना धक्काच बसला. ही महिला मृत नसून तिच्या प्रियकरासह पळून गेली होती, ज्याला पोलिसांनी आणि तिच्या पालकांनी मृत समजले होते. पोलिसांनी आता त्या महिलेला अटक केली आहे.
ही चित्रपटाची स्क्रिप्ट नसून एक वास्तव आहे, ज्याचा सामना त्या व्यक्तीला मोतिहारी बिहारमध्ये करावा लागतोय. घटना केशरिया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लक्ष्मीपूर गावातील असून, येथील शांती देवी नावाच्या महिलेचा विवाह 14 जून 2014 रोजी केशरिया येथील वॉर्ड क्रमांक चारमधील रहिवासी दिनेश राम याच्याशी झाला होता.
लग्नाच्या अनेक वर्षानंतर, 19 एप्रिल रोजी ही महिला तिच्या प्रियकरासह फरार झाली आणि पंजाबमधील जालंधरमध्ये त्याच्यासोबत राहू लागली. महिला बेपत्ता झाल्यानंतर तिचे वडील योगेंद्र राम यांनी पतीने हुंड्यासाठी छळ करून खून केल्याची लेखी तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा तपास न करता केसरिया पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी महिलेच्या पतीला खुनाच्या आरोपाखाली अटक करून तुरुंगात पाठवले. मात्र, एसएचओ शैलेंद्र सिंह यांना या प्रकरणात संशय आला आणि त्यांनी या प्रकरणात टेक्निकल सेलची मदत घेण्याचा निर्णय घेतला.
यानंतर महिलेचा फोन ट्रेस केल्यावर कळले की, ज्या महिलेला सर्वांनी मृत मानले होते, ती जिवंत असून ती पंजाबमधील जालंधरमध्ये तिच्या प्रियकरासोबत राहते. त्यानंतर एसएचओने मोतिहारी एसपींना याबाबत माहिती दिली. एसपींच्या आदेशानुसार, एक टीम तयार करून जालंधरला पाठवण्यात आली जिथून महिलेला मोतिहारी येथे आणण्यात आले आणि हे खळबळजनक प्रकरण पूर्णपणे उघड झाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.