William Shakespeare: 7 वर्षे गायब! 23 एप्रिल रोजी जन्म, त्याच तारखेला मृत्यू; महान लेखक 'शेक्सपिअर'बद्दल या गोष्टी माहितीयेत का?

William Shakespeare Biography: महत्वाची नाटके लिहून जगाला वेड लावणाऱ्या शेक्सपिअरचे आयुष्य खूप नाट्यमय आहे. शेक्सपिअर लंडनला आधी अभिनेता बनण्यासाठी गेला होता.
William Shakespeare Biography, William Shakespeare Birth Death Anniversary
William Shakespeare Birth Death Anniversary 23 AprilDainik Gomantak
Published on
Updated on

विलियम शेक्सपिअर हा सोळाव्या शतकातील महत्वाचा इंग्रजी कवी, नाटककार. आजही त्याचे साहित्य आवडीने वाचले जाते. त्याच्या कलाकृतीचे संदर्भ घेऊन साहित्य, नाटक, सिनेमा क्षेत्रात नवनिर्मिती अजूनही होत आहे इतके त्याचे लिखाण महत्वाचे आहे. जगातील सर्व महत्वाच्या भाषांमध्ये शेक्सपिअरचे साहित्य अनुवादित झालेले आहे.

शेक्सपिअरने जवळपास 37 नाटके आणि 154 सोनेट्ससह काही कवितासंग्रह असे महत्वाचे लिखाण केलेले आहे. सुरुवातीला विनोदी नाटके लिहिल्यानंतर शेक्सपिअरने थोडेफार ऐतिहासिक लिखाण केले आणि सोबत शोकांतिका. त्याच्या शोकांतिका जगप्रसिद्ध आहेत . त्याने The Two Gentlemens of Verona ही नाटक पहिल्यांदा लिहिले. Commedy Of Errors हे त्याचे सगळ्यात छोटे आणि Hamlet हे सगळ्यात मोठे नाटक आहे. A Midsummer Nights ही त्याचे सर्वाधिक सादर झालेले नाटक आहे.

शेक्सपिअरने इंग्रजी भाषेत नवीन 3000 शब्द दिले ज्यामध्ये Bedroom, Dawn, Excitement या रोजच्या वापरातील शब्दांचा समावेश होतो. शेक्सपिअर पदवीधर वगेरे न्हवता, ग्रामर स्कूलमध्ये त्याने जुजबी शिक्षण घेतेले होते.

महत्वाची नाटके लिहून जगाला वेड लावणाऱ्या शेक्सपिअरचे आयुष्य खूप नाट्यमय आहे. शेक्सपिअर लंडनला आधी अभिनेता बनण्यासाठी गेला होता. त्याने स्वतच्या काही नाटकांमध्ये कामही केलेले आहे.

नंतर तो लेखक म्हणून यशाच्या सर्वोच्च शिखरावर विराजमान झाला. पेशाने शेक्सपिअर व्यावसायिक होता, नंतर तो स्वतची थेटर कंपनी चालवू लागला. लिहिलेल्या नाटकातूनही त्याला चांगले पैसे मिळत असे. 1597 साली 30 खोल्यांचे घर निर्माण करून तो गावातील सगळ्यात महत्वाचा माणूस बनला.

1585 ते 1592 साली तो कुठे होता, काय करत होता याचे ठोस पुरावे आढळत नाहीत. अभ्यासक या कालखंडाला Shakespear's Lost Years History म्हणतात. त्यावेळी म्हणजे 1592 ते 1594 मध्ये युरोपात प्लेगची साथ आली आणि नाटकव्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला. शेक्सपिअरने या काळात अनेक कविता लिहिल्या. सोनेटसमधल्या महत्वाच्या रचना या काळात निर्माण झाल्या. आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो जिवंत असताना त्याचे कोणतेही साहित्य प्रकाशित झाले नाही.

William Shakespeare Biography, William Shakespeare Birth Death Anniversary
Bhagat Singh: भगतसिंग यांचे 'तरुण' आणि 'राजकारण' याबाबत काय विचार होते?

जन्म आणि मृत्यूबद्दल

शेक्सपिअरचा जन्म इंग्लंडमध्ये वॉर्वीकशायर परगण्याच्या स्ट्रॅटफोर्ड गावी एप्रिल 1564 मध्ये झाला. त्याच्या जन्माच्या तारखेबाबत अधिकृत नोंद उपलब्ध नाही आहे. शेक्सपिअरचा बाप्तिस्मा 26 एप्रिल 1564 रोजी झाला असल्याची नोंद स्ट्रॅटफोर्ड अपॉन एव्हॉन येथील होली ट्रिनिटी चर्चमधील पॅरिश रजिस्टरमध्ये आहे. बाप्तिस्मा साधारणपणे जन्मानंतर तीन दिवसांत होत असे. प्रार्थना पुस्तकानुसार मुलाच्या जन्मानंतरच्या पहिल्या रविवारी बाप्तिस्मा देणे आवश्यक असायचे. उपलब्ध नोंदीनुसार, तीन दिवसांच्या कालावधीची शक्यता ध्यानात घेऊन 23 एप्रिल हा त्याचा वाढदिवस म्हणून साजरा होऊ लागला.

William Shakespeare Biography, William Shakespeare Birth Death Anniversary
Jallianwala Bagh Massacre: जालियनवाला बागेत जखमींना मदत का केली नाही? जनरल डायर म्हणाला, 'ते माझं काम नव्हतं'

शेक्सपिअरचा जन्म झाला तेंव्हा जुन्या ज्यूलियन दिनदर्शिकेनुसार 23 एप्रिल तारीख येतो असाही एक मतप्रवाह आहे , ग्रेगरियन दिनदर्शिकेनुसार ही तारीख 3 मे अशी येते. ज्यूलियन कॅलेंडर जुन्या रोमन कॅलेंडरनंतर वापरात आले. ते सौर कॅलेंडर आहे. 1582 नंतर हळूहळू सुधारणा होत ग्रेगरियन कॅलेंडर वापरात आले.

शेक्सपिअरचा मृत्यू 23 एप्रिल 1616 रोजी त्याच्या वयाच्या 52 व्या वर्षी त्याच्या गावी झाला. शेक्सपिअरचा जन्म एप्रिल महिन्यातील असल्याने आणि वरील दोन्ही मुद्द्यामुळे पूर्वापार त्याचा जन्मदिवस त्याच्या मृत्यूदिनादिवशी म्हणजेच 23 एप्रिल रोजी साजरा करण्यात येतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com