ICC पाकिस्तान क्रिकेट टीमवर बंदी घालणार? दोन आठवड्यात होणार निर्णय, सोशल मीडियावर रंगली चर्चा

Pakistan cricket Team: गेल्या काही दिवसांत पाकिस्तान संघाने ज्या प्रकारे वारंवार ICC च्या नियमांचे उल्लंघन केले, त्यामुळे त्यांच्यावर मोठी कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
 Pakistan cricket Team
Pakistan cricket TeamDainik Gomantak
Published on
Updated on

Pakistan Cricket Team: यूएईमध्ये (UAE) सध्या आशिया कप 2025 थरार रंगला आहे. स्पर्धेतील सुपर 4 मधील सामने सुरु झाले आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यात रविवारी (21 सप्टेंबर) सुपर 4 मधील सामना झाला, ज्यामध्ये टीम इंडियाने पाकड्यांची दाणादाण उडवली. याचदरम्यान आता, सोशल मीडियावर सध्या वेगळीच चर्चा रंगली आहे, ज्यामुळे पाकिस्तान क्रिकेट संघाच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसांत पाकिस्तान संघाने ज्या प्रकारे वारंवार ICC च्या नियमांचे उल्लंघन केले, त्यामुळे त्यांच्यावर मोठी कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सोशल मीडियावरही यावर चर्चा सुरु आहे. राजीव नावाच्या एका ‘एक्स’ यूजरने लिहिले की, "ICC पाकिस्तानवर दोन वर्षांची बंदी घालण्याचा विचार करत आहे. यूएई विरुद्धच्या आशिया कपमधील PCB च्या वागणुकीमुळे ICC खूप नाराज आहे, तसेच पाकिस्तान क्रिकेट बोर्डात होणाऱ्या राजकीय हस्तक्षेपामुळेही ते नाखूश आहेत."

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष पाकिस्तानचे गृहमंत्रीच असल्याने त्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एप्रिल आणि मे महिन्यात पाकिस्तानी लष्कराने भारताने केलेल्या हल्ल्यात मोहसीन नक्वी यांचा सहभाग होता. आणि या आशिया कपमध्ये सराव सत्रादरम्यान नक्वी पाकिस्तानच्या क्रिकेट संघासोबत दिसले.

 Pakistan cricket Team
Mohammed Siraj: 'मिया मॅजिक'चा जलवा! विराटच्या पठ्ठ्यानं दिग्गजांना मागं सोडत जिंकला ICC 'प्लेअर ऑफ द मंथ' पुरस्कार

वाद कुठून सुरु झाला?

या स्पर्धेतील भारत आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यात 14 सप्टेंबर रोजी झालेल्या सामन्यादरम्यान वादाला सुरुवात झाली. सूत्रांनुसार, त्या सामन्यानंतर भारतीय संघातील कोणत्याही खेळाडूने पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन केले नाही, ज्यामुळे पाकिस्तानचा संघ नाराज झाला होता. यानंतर, पाकिस्तानचा यूएईसोबत सामना होण्यापूर्वी पाकिस्तानने सामन्यावर बहिष्कार घालण्याची धमकी दिली. यामुळे हा सामना निर्धारित वेळेपेक्षा एक तास उशिरा सुरु झाला. याच घटनेमुळे वाद आणखी वाढला.

 Pakistan cricket Team
Mohammed Siraj: 'मिया मॅजिक'चा जलवा! विराटच्या पठ्ठ्यानं दिग्गजांना मागं सोडत जिंकला ICC 'प्लेअर ऑफ द मंथ' पुरस्कार

यूएई विरुद्धच्या सामन्यापूर्वी पाकिस्तानच्या मीडिया मॅनेजरने अनेक नियमांचे उल्लंघन केले. मीडिया मॅनेजरने मोबाईल फोन घेऊन थेट मॅच रेफरी अँडी पायक्रॉफ्टच्या रुममध्ये प्रवेश केला. त्यांनी रेफरीसोबत झालेले संभाषण रेकॉर्ड केले. एवढचं नाहीतर तो व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड देखील केला.

हे रेकॉर्डिंग पाकिस्तानच्या मीडिया मॅनेजरने यासाठी केले होते, जेणेकरुन जगाला हे दाखवता येईल की आम्ही मॅच रेफरी अँडी पायक्रॉफ्ट यांच्याकडून माफी मागून घेतली आहे. पण प्रत्यक्षात असे काहीही झाले नव्हते. या गंभीर घटनेनंतर आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद पाकिस्तान संघावर कारवाई करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. मात्र आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून अद्याप कोणत्याही स्वरुपाची प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com