
Bhojpuri Viral Video: सोशल मीडियाच्या जगात दररोज काहीतरी नवीन व्हायरल होत असते. सध्या असाच एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका बंद खोलीतून आवाज येत असल्याचे ऐकून एका व्यक्तीने दरवाजा उघडला आणि आत जे दृश्य दिसले ते पाहून तो थक्क झाला. दरवाजा उघडताच त्याला दिसले की, आतमध्ये त्याची पत्नी भोजपुरी गाण्यावर ठेका धरत आहे. ती पूर्ण जोश आणि मस्तीत नाचत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. विशेष म्हणजे, गाण्यावर नाचण्यासोबतच ती स्वयंपाकही करत आहे.
व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही पाहू शकता की, एका बंद खोलीतून आवाज बाहेर येत आहेत. खोलीची कडी आतून लावली नव्हती, फक्त दरवाजा हलकासा बंद केला होता. बाहेर उभा असलेला नवरा जसा खोलीचा दरवाजा उघडतो, तसा तो आतले दृश्य पाहून आश्चर्यचकित होतो. त्याला दिसते की, आतमध्ये त्याची पत्नी भोजपुरी गाण्यावर पूर्ण जोश आणि मस्तीने डान्स करत आहे. त्यासोबतच ती खाली चुलीवर भाजीही शिजवत आहे.
व्हिडिओ पाहून असे वाटते की, कदाचित हे दोघे पती-पत्नी असावेत. पत्नीला अशा प्रकारे डान्स करताना पाहून नवरा तिला विचारतो की, "तू स्वयंपाक करत आहेस की नाचत आहेस?" यावर पत्नी उत्तर देते की, "स्वयंपाक होत आहे," आणि ती पुन्हा डान्स करु लागते. मध्येच ती भाजीही ढवळते.
नवरा तिला म्हणतो की, "भाजी जळून जाईल," पण पत्नी डान्समध्ये इतकी मग्न होती की, ती म्हणते, "नाही जळणार," आणि पुन्हा एकदा भाजी ढवळून डान्स करु लागते. मग नवरा म्हणतो की, "एकतर स्वयंपाक कर किंवा डान्स कर." यावर पत्नी म्हणते की, "मी दोन्ही गोष्टी एकाच वेळी करेन," आणि उत्तर दिल्यानंतर तिचा डान्स पुन्हा सुरु होतो. मग नवरा म्हणतो की, "जर भाजी जळाली तर सांगतो तुला," ज्यावर पत्नी उत्तर देते की, "भाजी जळणार नाही." यानंतर बायको पुन्हा डान्स करु लागते.
दुसरीकडे, हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर @miss_sheetu_16 नावाच्या युझरने शेअर केला आहे. आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून, हजारो लोकांनी तो लाईक केला आहे. व्हिडिओवर अनेक लोकांनी कमेंट करत महिलेच्या (Women) डान्सचे कौतुक केले. एका युझरने लिहिले की, "माणसाने असेच आनंदी राहायला हवे, जो काम करत असतानाही आनंद घेऊ शकतो, असे लोक नेहमी आनंदी राहतात." दुसऱ्याने लिहिले की, "वहिनी खूप गोड आहेत आणि त्यांच्याहून गोड त्यांचा डान्स आहे."
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.