Board Exam: परिक्षेत कॉपी करणे ठरणार देशाच्या सुरक्षेला धोका

Board Exam: विद्यार्थी परिक्षेदरम्यान कॉपी करताना जर पकडला गेला तर त्याना मोठ्या शिक्षेला सामोरे जावे लागणार आहे.
Goa Board Exam Date Announced
Goa Board Exam Date AnnouncedDainik Gomantak

Board Exam: दहावी, बारावीच्या बोर्डाच्या परिक्षेत बऱ्याचदा विद्यार्थी कॉपी करताना दिसून येतात. आता यावर प्रतिबंध घालण्यासाठी उत्तरप्रदेश सरकारने काही नियम लागू केले आहेत. विद्यार्थी परिक्षेदरम्यान कॉपी करताना जर पकडला गेला तर त्याना मोठ्या शिक्षेला सामोरे जावे लागणार आहे.

उत्तरप्रदेशमध्ये 16 फेब्रुवारीपासून बोर्ड परिक्षा सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर आधारित उत्तरप्रदेश सरकारने या नियमांची तसेच बदलेल्या शिक्षेच्या स्वरुपाची घोषणा केली आहे.आता दहावी बारावीच्या परिक्षेदरम्यान कॉपी करताना पकडले गेल्यास एनएसए( NSA )अर्थात राष्ट्रीय सुरक्षा अधिनियम 1980 लागू होणार आहे. त्याचबरोबर, अशा विद्यार्थ्यांना मदत करणाऱ्या शिक्षक किंवा अन्य व्यक्तींची संपत्ती जप्त केली जाणार असल्याचे उत्तर प्रदेश सरकारने म्हटले आहे. याशिवाय जे परिक्षाव्यवस्थापक यामध्ये सामिल झाल्याचे आढळून येईल त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येईल असेही या नियमावलीत म्हटले आहे. दरम्यान, दहावी-बारावी परिक्षेदरम्यान उत्तरप्रदेश, बिहार( Bihar ) या राज्यांमध्ये कॉपी करण्याचे प्रमाण मोठे आहे. म्हणून सरकारने यावेळी शिक्षेची कडक तरतूद केली आहे.

काय आहे एनएसए( NSA) कायदा ?

प्रशासनाला वाटले एखाद्या व्यक्तीकडून देशाच्या सुरक्षेला धोका आहे तर त्या व्यक्तीला एनएसए कायद्यातंर्गत अटक केली जाते. देशाच्या सुरक्षेच्यादृष्टीने यामध्ये या कायद्यात तरतूद केली आहे. हा एक प्रिवेंटिव्ह कायदा आहे. म्हणजेच या कायद्यातंर्गत एखादा गुन्हा घडण्याअगोदरच संदिग्ध व्यक्तीला अटक केली जाऊ शकते.

Goa Board Exam Date Announced
Andaman & Nicobar: अंदमान-निकोबाराच्या विविध बेटांना मोदींनी दिली 'ही' नावे, तुम्हालाही वाटेल अभिमान

अशा व्यक्तीला 3 महिने जामिनाशिवाय जेलमध्ये ठेवले जाऊ शकते. तसेच 3-3 महिन्यांनी हा कालावधी वाढवला जाऊ शकतो. शिक्षेच्या कडक स्वरुपामुळे विद्यार्थ्यांकडून होणाऱ्या अशा गैरप्रकाराला आळा बसू शकतो असे मत प्रशासनाने व्यक्त केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com