पाटणा: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी हुंडा प्रथेवर जोरदार निशाणा साधला आहे. कुमार म्हणाले की, मुलीशी लग्न करण्यासाठी हुंडा मागण्यापेक्षा वाईट काहीही असू शकत नाही. अहो, लग्न झालं तर मूल होईल ना? मुलाने मुलाशी लग्न केले तर मुले होतील का? लग्नासाठी हुंडा घेतो, यापेक्षा मोठा अन्याय आहे का? (what if man marries another man Nitish Kumar on dowry system)
दरम्यान, सीएम नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी पाटणा येथील मुलींच्या वसतिगृहाच्या उद्घाटनप्रसंगी ही जहरी टीका केली. यावेळी नितीश म्हणाले की, ''आमच्या काळात कॉलेजमध्ये मुली नसत. ही गोष्ट किती वाईट होती, पण आज मुली मेडिकल असो की इंजिनीअरिंग प्रत्येक क्षेत्रात पुढे जात आहेत. महिला सक्षमीकरणासाठी अनेक उपक्रम राबविण्यात आले आहेत. आम्ही दारुबंदी लागू केली. हुंडा प्रथा आणि बालविवाहाविरोधात आम्ही मोहीम सुरु केली आहे. मुलीच्या लग्नासाठी हुंडा मागण्यापेक्षा वाईट काहीही नाही. आम्ही म्हटले आहे की, जर कोणी लग्न करुन हुंडा घेत नाही असे लिहित असेल तरच आम्ही त्यांच्या लग्नाला उपस्थित राहणार, अन्यथा नाही.''
तसेच, नितीश कुमार जातनिहाय जनगणनेच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आहेत. या प्रकरणी नितीश कुमार यांनी केलेल्या घोषणेमुळे मित्रपक्ष असणाऱ्या भाजपची (BJP) कोंडी झाली आहे. नितीश यांनी सोमवारी सांगितले की, बहुधा शुक्रवारी बैठक होणार आहे.
भाजप नेते तारकिशोर प्रसाद (Tarkishore Prasad) यांनी पत्रकारांना सांगितले की, 'मुख्यमंत्र्यांच्या निमंत्रणाबाबत दिल्लीस्थित पक्ष नेतृत्वाकडून 'मार्गदर्शन' पत्रिका मागवण्यात आली आहे.' तसे पाहता नितीश यांनी जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा सापळा रचून आघाडी आणि पक्षातील त्रुटी उघड केल्या आहेत, असे भाजप नेत्यांचे वैयक्तिक मत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.