बंगालमधील तरुणांना जडलं विचित्र व्यसन; नशेसाठी करतायेत कंडोमचा वापर

असुरक्षित लैंगिक संबंधांपासून संरक्षण करण्यासाठी कंडोमचा वापर केला जात असला, तरी येथील तरुण त्याचा वापर ड्रगप्रमाणे करत आहेत.
 condom
condom Dainik Gomantak
Published on
Updated on

Bengal condom sales: पश्चिम बंगालमधील दुर्गापूर शहरात सध्या तरुणांना एक विचित्र व्यसन लागले आहे. आणि ते व्यसन दारू कंवा सिगारेटचे नसून कंडोमचे व्यसन आहे. असुरक्षित लैंगिक संबंधांपासून संरक्षण करण्यासाठी कंडोमचा वापर केला जात असला, तरी येथील तरुण त्याचा वापर ड्रगप्रमाणे करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून शहरात कंडोमच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे. अनेक दुकानांमध्ये साठा आल्यानंतर काही तासांनी संपत आहे. ड्रग्जसाठी कंडोमचा वापर केल्याने शहरातील प्रत्येकजण हैराण झाला आहे. तरुणांमधील हे नवीन व्यसन प्रशासनाचीही चिंता वाढवत आहे.

 condom
President Powers: राष्ट्रपतींचे अधिकारी तुम्हाला माहितीयेत का? वाचा सविस्तर

गेल्या काही दिवसांपासून दुर्गापूरमधील दुर्गापूर सिटी सेंटर, विधाननगर, बेनाचिती आणि मुचीपारा, सी झोन, ए झोन अशा विविध भागात फ्लेवर्ड कंडोमच्या विक्रीत मोठी वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे. अचानक झालेल्या या वाढीमुळे आश्चर्यचकित झालेल्या एका स्थानिक दुकानदाराने आपल्या जागेवरून वारंवार कंडोम खरेदी करणाऱ्या तरुणाला विचारले. तर नशेसाठी ते विकत घेतो, असे आश्चर्यकारक उत्तर त्याने दिले. दुर्गापूर येथील एका मेडिकल स्टोअरचालकाने सांगितले की, पूर्वी दररोज केवळ 3 ते 4 पॅकेट कंडोम विकले जात होते, परंतु आता पूर्ण पॅक विकले जात आहेत.

हे युवक नशेसाठी कंडोमचा वापर कसा करतात याची माहिती देताना दुर्गापूर येथील मंडळ हॉस्पिटलमध्ये काम करणारे धीमान मंडल म्हणाले की, कंडोममध्ये काही सुगंधी संयुगे असतात. अल्कोहोल बनवताना ते तुटतात. आणि हे व्यसन सावणारे कंडोम असतात. त्यांनी सांगितले की हे सुगंधी संयुग डेंड्राइट गममध्ये देखील आढळते. अनेक लोक नशेसाठी डेंड्राइटचाही वापर करतात.

 condom
Yediyurappa: येडियुरप्पांचं पुत्र प्रेम, विधानसभा निवडणुकीत सोडणार शिकारीपुराची जागा

दुर्गापूर आरई कॉलेज मॉडेल स्कूलचे रसायनशास्त्राचे शिक्षक नूरुल हक म्हणाले की, गरम पाण्यात कंडोम जास्त वेळ भिजवून ठेवल्याने मोठे सेंद्रिय रेणू अल्कोहोल कंपाऊंडमध्ये मोडतात, ज्यामुळे नशा होते. नशेसाठी विचित्र गोष्टी वापरण्याची ही पहिलीच घटना नाही. 21 व्या शतकाच्या मध्यात, नायजेरियामध्ये टूथपेस्ट आणि शूच्या शाईची विक्री अचानक 6 पटीने वाढली होती. लोक त्यांचा नशेसाठी वापर करू लागले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com