Crime News: धक्कादायक! वर्गमित्राने जेवणाच्या बहाण्याने बाहेर नेलं, मग आणखी दोघे आले अन्... MBBSच्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार

West Bengal Crime News: पश्चिम बंगालमधील दुर्गापूर येथील एका खाजगी वैद्यकीय महाविद्यालयातील दुसऱ्या वर्षाच्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार झाल्याचा आरोप आहे.
Crime News
Crime NewsDainik Gomantak
Published on
Updated on

पश्चिम बंगालमधील दुर्गापूर येथील एका खाजगी वैद्यकीय महाविद्यालयातील दुसऱ्या वर्षाच्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार झाल्याचा आरोप आहे. पीडिता ही ओडिशातील जलेश्वर येथील रहिवासी आहे. पीडितेच्या वडिलांनी सांगितले की त्यांना फोनवरून या क्रूरतेची माहिती देण्यात आली.

पीडितेच्या वडिलांनी सांगितले की, रात्री १० वाजता त्यांना मुलीच्या मैत्रिणीने फोन करून ही गंभीर घटना सांगितलू. पीडितेच्या वडिलांचे म्हणणे आहे, “आम्ही जलेश्वर येथे राहतो, आणि माझी मुलगी येथे शिक्षण घेण्यासाठी आली होती. काल एका वर्गमित्राने तिला जेवण्यासाठी बाहेर नेले, मात्र त्याचवेळी आणखी दोन-तीन व्यक्ती तिथे आले आणि त्याने तिला सोडून पळून गेला. त्या पुरुषांनी माझ्या मुलीवर बलात्कार केला."

Crime News
Ronaldo In Goa: रोनाल्डो गोव्यात येणार? CM सावंतांनी केले आशावादी वक्तव्य; राज्याला ‘सुपरस्टार’च्या आगमनाचे वेध

ते म्हणाले की, हे प्रशासन आपले काम योग्यरित्या करत नाही, म्हणूनच दररोज या घटना घडत आहेत. हे सर्व असूनही, एक राष्ट्रीय अहवाल (एनसीआरबी) समोर आला आहे ज्यामध्ये पश्चिम बंगालला सर्वात सुरक्षित राज्य म्हणून वर्णन केले आहे आणि ते पहिल्या क्रमांकावर आहे.

हा अहवाल तयार करणाऱ्यांना आम्ही आव्हान देऊ. ते हा अहवाल कसा तयार करतात? या अहवालात पश्चिम बंगाल पहिल्या क्रमांकावर कसा आहे? असं म्हणत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com