Weather Update: येत्या काही तासांत देशातील 15 राज्यांमध्ये पडणार पाऊस

देशभरातील थंडी (Cold) आता हळूहळू संपत चालली आहे. दरम्यान, उत्तर भारतात (North India) पुन्हा एकदा हवामानात बदल (Weather) होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
 Rain
RainDainik Gomantak
Published on
Updated on

देशभरातील थंडी (Cold) आता हळूहळू संपत चालली आहे. दरम्यान, उत्तर भारतातील हवामानात (North India) पुन्हा एकदा बदल (Weather) होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या मतानुसार, चक्रीवादळाचे परिवलन दक्षिणपूर्व बंगालचा उपसागर (Bay of Bengal) आणि अंदमानच्या समुद्रावर होऊ लागले आहे. याशिवाय 22 फेब्रुवारीच्या रात्री वेस्टर्न डिस्टर्बन्स पश्चिम हिमालयाच्या (Himalaya) जवळ येण्याची शक्यता आहे. त्यामुळे 22 ते 23 फेब्रुवारीदरम्यान देशातील 15 राज्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अंदमान आणि निकोबार बेटांवर मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. (Weather Update Rain Will Fall In 15 States Of The Country In The Next Few Hours)

दरम्यान, पुढील 24 तासांत अरुणाचल प्रदेशात (Arunachal Pradesh) हलका ते मध्यम पाऊस आणि हिमवृष्टीची शक्यता आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, पश्चिम हिमालयात 22 ते 24 फेब्रुवारी दरम्यान पाऊस आणि बर्फवृष्टी आणखी काही दिवस वाढू शकते. 22 आणि 23 फेब्रुवारीला हिमालयीन टेकड्यांवर विखुरलेल्या हिमवृष्टी होऊ शकते. या व्यतिरिक्त पंजाब, हरियाणा, दिल्ली, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीमच्या काही भागांमध्ये तुरळक पावसाची शक्यता आहे. IMD ने 23 फेब्रुवारीपर्यंत सिक्कीममध्ये (Sikkim) हलक्या किंवा मध्यम पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्याचबरोबर पश्चिमेकडील प्रभावामुळे पुढील 24 तासांत पश्चिम हिमालयीन प्रदेशात हलका पाऊस किंवा हिमवृष्टी अपेक्षित आहे.

 Rain
Weather Updates: मध्य भारतात पावसासह बर्फवृष्टी होण्याची शक्यता

दिल्लीत जोरदार वारे वाहण्याची शक्यता

हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, 22 फेब्रुवारीपासून दिल्लीत दोन दिवस जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. दिल्लीत आज किमान तापमान 10 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. तर कमाल तापमान 26 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. त्याच वेळी, उत्तराखंडची राजधानी डेहराडूनचे किमान तापमान 8 अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान 23 अंश सेल्सिअस असू शकते.

जम्मू-काश्मीरमध्ये आठवडाभर पावसाचा अंदाज

दुसरीकडे, काश्मीरमध्ये 23 फेब्रुवारीपर्यंत पाऊस आणि बर्फवृष्टी सुरु राहणार आहे. जम्मूमध्येही पाऊस पडू शकतो. जम्मू-काश्मीरमध्ये कमाल तापमान 23 अंश तर किमान तापमान 14 अंशांपर्यंत राहण्याची शक्यता आहे. संपूर्ण आठवडाभर जम्मू-काश्मीरच्या अनेक भागात पावसाची शक्यता आहे. त्यामुळे किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे.

 Rain
Weather Updates: उत्तर भारतासह ओडिशामध्ये पुन्हा येणार थंडीची लाट !

उत्तराखंडच्या अनेक भागात पाऊस पडू शकतो

उत्तराखंडमध्ये मंगळवारी उंच भागात बर्फवृष्टी झाली. त्यानंतर अनेक भागात पावसाचीही नोंद झाली. त्याचवेळी हवामान खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार पुढील तीन ते चार दिवस राज्यात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे किमान तापमानात घट होणार आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान 14 अंशांपर्यंत, तर किमान तापमान 2 अंशांपर्यंत राहण्याचा अंदाज आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com