Watch: भिक्षेकरी झाले फॉरवर्ड! भीक मागण्यासाठी वापरतायेत QR कोड

Guwahatis Digital Beggar: आसाममधील एका अंध भिकाऱ्याने भीक मागण्याच्या त्याच्या अनोख्या स्टाईलने सोशल मीडिया वापरकर्त्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
Guwahatis Digital Beggar
Guwahatis Digital BeggarDainik Gomantak
Published on
Updated on

Guwahatis Digital Beggar: आसाममधील एका अंध भिकाऱ्याने भीक मागण्याच्या त्याच्या अनोख्या स्टाईलने सोशल मीडिया वापरकर्त्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. ट्विटरवर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, दशरथ नावाचा भिकारी डिजिटल पेमेंटद्वारे भिक्षा स्वीकारताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये त्याने गळ्यात QR कोड असलेले PhonePe कार्ड घातलेले दिसत आहे. दशरथ एका कारमध्ये बसलेल्या दोन लोकांकडे जातो. त्यापैकी एकजण क्यूआर कोड स्कॅन करुन त्याला ₹10 पाठवतो. त्याच्या अकाऊंटमध्ये पैसे जमा झाल्याची सूचना ऐकण्यासाठी दशरथ त्याचा फोन कानाजवळ नेतो. दरम्यान, हा व्हिडिओ काँग्रेस नेते गौरव सोमाणी यांनी ट्विटरवर शेअर केला आहे.

दरम्यान, सोमाणी यांनी ट्विटरवरील आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, ''# गुवाहाटीच्या गजबजाटात एक विलक्षण दृश्य पाहायला मिळाले- एक भिकारी PhonePe च्या माध्यमातून डिजिटल स्वरुपात भिक्षा स्वीकारत आहे! तंत्रज्ञानाला खरोखरच सीमा नसते. सामाजिक-आर्थिक स्थितीतील अडथळ्यांनाही पार करण्याच्या तंत्रज्ञानाच्या सामर्थ्याचा हा दाखला आहे. एक विचार करायला लावणारा क्षण जो करुणा आणि नवनिर्मितीच्या विकसित होत असलेल्या लँडस्केपबद्दल खूप काही सांगून जातो.''

Guwahatis Digital Beggar
''भारत माता की जय' अन् जय हिंद'चा नारा पहिल्यांदा मुस्लिमांनी दिला...'': केरळच्या CM चा RSS वर हल्लाबोल

दुसरीकडे, भिकाऱ्याकडून डिजिटल पेमेंट वापरण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी, बिहारमधील 40 वर्षीय व्यक्ती गळ्यात QR कोडचे कार्ड आणि डिजिटल टॅब्लेट घेऊन लोकांना डिजिटल मोडद्वारे पैसे देण्याचा पर्याय देऊन बेतिया रेल्वे स्टेशनवर भीक मागताना दिसला होता.

स्वतःला राज्याचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांचा अनुयायी म्हणवून घेणाऱ्या डिजिटल भिकारी राजू पटेलने म्हटले की, ''तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडिया मोहिमेपासून प्रेरित झाला. तो पंतप्रधान मोदींचा 'मन की बात' कार्यक्रम ऐकायला विसरत नाही.'' नवी दिल्लीत, 29 वर्षीय ट्रान्सवुमन आयशा शर्मा देखील UPI पेमेंट ॲप्सद्वारे पैसे स्वीकारत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com