भारतीय नौदलात दाखल होणार सुरत-उदयगिरी या स्वदेशी युद्धनौका

नौदलाच्या 39 बांधकामाधीन जहाजांपैकी 37 भारतीय शिपयार्डमध्ये बांधल्या जात आहेत.
Udaygiri, Surat Warship
Udaygiri, Surat WarshipANI
Published on
Updated on

भारतीय नौदलाने बांधलेल्या दोन स्वदेशी आघाडीच्या युद्धनौकांचे आज उद्घाटन होणार आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे . 'सुरत' (Surat) आणि 'उदयगिरी' (Udaygiri) नावाच्या या दोन युद्धनौका मुंबईतील (Mumbai) माझगाव डॉक्स लिमिटेड येथे दाखल होणार आहेत. (Indian Navy Udaygiri, Surat Warship)

संरक्षण मंत्रालयाने अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, 'सुरत' ही 15B नाशक प्रकल्पाची युद्धनौका आहे आणि 'उदयगिरी' ही 17A फ्रिगेट प्रकल्पाची युद्धनौका आहे. दोन्ही जहाजांची डिझाईन नौदल रचना संचालनालयाने केली आहे, जी देशातील सर्व युद्धनौका डिझाइन क्रियाकलापांसाठी मुख्य स्त्रोत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

संरक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, सध्या 50 हून अधिक जहाजे आणि पाणबुड्या तयार केल्या जात आहेत. मंत्रालयानुसार, भारतीय नौदलात सुमारे 150 जहाजे आणि पाणबुड्यांचा समावेश आहे. 'आत्मनिर्भर भारत' या विषयावर बोलताना, भारतीय नौदल प्रमुख अॅडमिरल आर हरी कुमार यांनी डिसेंबर 2021 मध्ये सांगितले की, 'गेल्या सात वर्षांत नौदलात समाविष्ट केलेली सर्व 28 जहाजे आणि पाणबुड्या भारताने बांधल्या आहेत. नौदलाच्या 39 बांधकामाधीन जहाजांपैकी 37 भारतीय शिपयार्डमध्ये बांधल्या जात आहेत.'

'उदयगिरी' युद्धनौकेचे नाव पर्वतराजींच्या नावावरून

'उदयगिरी' युद्धनौका, ज्याला आंध्र प्रदेशातील पर्वतराजींचे नाव देण्यात आले आहे, हे जहाज प्रोजक्ट 17A फ्रिगेट्स अंतर्गत तयार केलेले तिसरे जहाज आहे. जे प्रगत शस्त्रे, सेन्सर्स आणि प्लॅटफॉर्म व्यवस्थापन प्रणालीने सुसज्ज आहे. ही युद्धनौका 'उदयगिरी'च्या आधीच्या आवृत्तीचा फेसलिफ्ट आहे. 18 फेब्रुवारी 1976 ते 24 ऑगस्‍ट 2007 या तीन दशकांमध्‍ये त्‍याच्‍या सेवेमध्‍ये अनेक आव्हानात्मक कार्ये पाहण्‍यात आली आहेत. त्याच वेळी, 'सुरत' हे प्रोजेक्ट 15B चा भाग आहे आणि भारताने बांधलेल्या सर्वात धोकादायक जहाजांपैकी एक आहे. दोन्ही युद्धनौकांमध्ये 75 टक्के स्वदेशी उपकरणे आणि यंत्रणा वापरण्यात आल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com