'आजच्या महागाईला नेहरुच जबादार'; भाजप मंत्र्याचे विधान

शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) यांच्या सरकारमधील वैद्यकीय शिक्षण मंत्री विश्वास सारंग यांनी हे विधान केले आहे.
Controversial Statement of Vishvas Sarang
Controversial Statement of Vishvas SarangDainik Gomantak
Published on
Updated on

मध्य प्रदेशातील भारतीय जनता पक्षाच्या (BJP) मंत्र्याने महागाईच्या समस्येसाठी देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि 15 ऑगस्ट 1947 रोजी लाल किल्ल्यावरुन केलेले भाषण जबाबदार असल्याचे विधान केले आहे. यावेळी बोलताना मंत्री विश्वास सारंग (Vishvas Sarang) यांनी, “महागाईची समस्या एक-दोन दिवसात निर्माण झाली नाही. 15 ऑगस्ट 1947 रोजी जवाहरलाल नेहरूंच्या भाषणाच्या चुकांमुळे अर्थव्यवस्था खाली घसरत आहे.” असे मत व्यक्त केले आहे. (Vishwas Sarang said that Pandit Nehru is responsible for the current state of the economy)

शिवराज सिंह चौहान यांच्या सरकारमधील वैद्यकीय शिक्षण मंत्री विश्वास सारंग महागाई आणि इतर मुद्द्यांवर काँग्रेसच्या कामगिरीवर प्रतिक्रिया देत होते. भोपाळमध्ये पत्रकारांशी बोलताना सारंग म्हणाले, "स्वातंत्र्यानंतर अर्थव्यवस्थेला पंगु करून महागाई वाढवण्यासाठी कोणी जबाबदार असेल, तर ते नेहरू कुटुंब आहे."

पुढे ते असेही म्हणाले की, "महागाई एक -दोन दिवसात वाढत नाही. अर्थव्यवस्थेचा पाया एक -दोन दिवसात घातला जात नाही. 15 ऑगस्ट 1947 रोजी जवाहरलाल नेहरूंनी लाल किल्ल्यावरून दिलेल्या भाषणामधील चुकांमुळे देशाची अर्थव्यवस्था ढासळू लागली आहे.

Controversial Statement of Vishvas Sarang
केंद्रीय मंत्रीपद गेलेल्या BJP च्या 'या' नेत्याने थेट राजकारणातूनच घेतला संन्यास

दरम्यान, विश्वास सारंग हे पुढे असेही म्हणाले आहेत की, कॉंग्रेसला जर खरोखर महागाई आणि अर्थव्यवस्थेच्या मुद्द्यावरुन निदर्शनं करायची असतील तर त्यांनी ती दिल्लीच्या 10जनपथ येथे करवावी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com