Andhra Pradesh CM Reddy: आंध्र प्रदेशच्या राजधानीत बदल झाला आहे. आता विशाखापट्टणम ही दक्षिण भारतीय राज्याची नवी राजधानी म्हणून ओळखली जाईल. मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी मंगळवारी ही घोषणा केली. यासोबतच त्यांनी नव्या राजधानीत ग्लोबल इन्व्हेस्टर समिट आयोजित करण्याची घोषणा केली आहे.
सीएम रेड्डी यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर पोस्ट केलेल्या व्हिडिओनुसार, ते म्हणाले की, 'मी तुम्हाला विशाखापट्टणमला आमंत्रित करतो, जी येत्या काही दिवसांत आमची राजधानी बनणार आहे. येत्या काही महिन्यांत मी विशाखापट्टणमलाही (Visakhapatnam) शिफ्ट होत आहे. आम्ही 3 आणि 4 मार्चला विशाखापट्टणम येथे या शिखर परिषदेचे आयोजन करणार आहोत…'
विशेष म्हणजे, आंध्र प्रदेश (Andhra Pradesh) सरकारने तेलंगणापासून वेगळे झाल्यानंतर 9 वर्षानंतर हा निर्णय घेतला आहे. 23 एप्रिल 2015 रोजी अमरावतीला आंध्र प्रदेशची राजधानी घोषित करण्यात आली. त्यानंतर 2020 मध्ये राज्याच्या तीन राजधानींचे नियोजन करण्यात आले. यामध्ये अमरावती, विशाखापट्टणम आणि कुर्नूल या शहरांचा समावेश आहे. मात्र, नंतर ती मागे घेण्यात आली आणि अमरावती ही राजधानी राहिली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.