अनेक वेळा टशनबाजी करण्याच्या नादात खूप लोक मुद्दाम स्वतःचा जीव धोक्यात घालताना दिसतात. निसर्गात असे अनेक जीव आहेत, ज्यांच्याशी थोडीशीही छेडछाड तुमच्यासाठी घातक ठरू शकते. असे अनेक प्राणी आहेत, ज्यांच्या एका झटक्याने माणूस मृत्यूच्या दारात जाऊ शकतो. असे असूनही लोक असे कृत्य करण्यापूर्वी एकदाही विचार करत नाहीत. नुकताच असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती जाणूनबुजून स्वतःच्या मृत्यूला आमंत्रण देताना दिसत आहे.
(Youth Kissed KIng Cobra )
अलीकडेच, कर्नाटकातील शिवमोग्गा येथून एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये एक माणूस किंग कोब्राचे चुंबन घेण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की त्या व्यक्तीच्या या निष्काळजीपणाने त्याचे काय झाले.
व्हिडीओच्या सुरुवातीला तुम्हाला एक माणूस हातात कोब्रा धरलेला दिसेल, ज्याला पाहण्यासाठी अनेक लोक तेथे जमतात. दरम्यान, ती व्यक्ती मागून कोब्राचे चुंबन घेण्याचा प्रयत्न करते, तोच अचानक कोब्रा वळतो आणि त्याच्या ओठांवर दंश करतो; तेव्हाच कोब्रा त्या व्यक्तीचा हात सुटतो.
हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे, जो पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. असे सांगितले जात आहे की, बचावकर्ता कोब्राचे चुंबन घेण्याचा प्रयत्न करत होता, त्याच दरम्यान कोब्राने त्याला आपला इंगा दाखवला आणि त्या व्यक्तीच्या ओठांवर दंश केला. अपघातानंतर त्या व्यक्तीला तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले असून त्याचा धोका टळला आहे. ही घटना भद्रावतीच्या बोम्मनकट्टेची आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.