Viral Video: व्ह्यूजसाठी कायपण...साडीला लागली आग आणि महिलेचा डान्स झाला व्हायरल, नेटिझन्स म्हणाले, 'पगला गई है'

Girl Dance Viral Video: आजच्या डिजिटल युगात सोशल मीडियावर लोकप्रिय होण्याची स्पर्धा प्रचंड वाढली आहे. लोक व्हायरल होण्यासाठी आणि जास्तीत जास्त लाईक्स-व्ह्यूज मिळवण्यासाठी काहीही करण्यास तयार असतात.
Girl Dance Viral Video
Girl Dance Viral VideoDainik Gomantak
Published on
Updated on

आजच्या डिजिटल युगात सोशल मीडियावर लोकप्रिय होण्याची स्पर्धा प्रचंड वाढली आहे. लोक व्हायरल होण्यासाठी आणि जास्तीत जास्त लाईक्स-व्ह्यूज मिळवण्यासाठी काहीही करण्यास तयार असतात. पण या हव्यासात काहीजण आपला जीवही धोक्यात घालतात. सध्या असाच एक प्रकार चर्चेत आला आहे, जिथे एका महिलेने इंस्टाग्राम रीलसाठी स्वतःची साडी पेटवून नाच केला. हा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने पसरत आहे.

व्हिडिओमध्ये दिसते की महिला साडीच्या पल्लूला आग लावून डान्स करत आहे. जळत्या पल्लूसह ती सहजतेने डान्स स्टेप्स करत आहे, मात्र ही दृश्ये अत्यंत धोकादायक आहेत. तिच्या जवळच उभा असलेला एक व्यक्ती हे सर्व कॅमेऱ्यात टिपत आहे, जणू काही हा रोजचाच प्रकार आहे. अशा प्रकारचे स्टंट केवळ त्या व्यक्तीसाठीच नव्हे, तर आसपासच्या लोकांसाठीही प्राणघातक ठरू शकतात.

Girl Dance Viral Video
Goa Coconut: नारळांसाठी गोवा परराज्यांवर अवलंबून! हॉटेल्स, रेस्टॉरंट्स वाढीमुळे वापर वाढला; कृषिमंत्री नाईकांनी दिली माहिती

हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील @more_fun_007 या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटिझन्सकडून संताप व्यक्त केला जात आहे. एका वापरकर्त्याने लिहिले, "लाईक्ससाठी लोक किती खाली जात आहेत, याचं हे उदाहरण आहे." तर दुसऱ्याने प्रतिक्रिया दिली, "आजकाल रीलबाज पूर्णपणे वेडे होत आहेत."

Girl Dance Viral Video
Goa Athletics: साक्षी, राणी, निकेतचा ‘डबल’ धमाका! राज्य ॲथलेटिकमध्ये पुरुषांत मोझेस, अनंतकृष्णन यांच्यात चढाओढ

अशा प्रकारचे धोकादायक स्टंट टाळले पाहिजेत. सोशल मीडियावरील लोकप्रियतेसाठी प्राण धोक्यात घालणे केवळ बेजबाबदारपणा नसून कायद्याच्या दृष्टीनेही चुकीचे ठरू शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com