
Indian Businessman Builds Taj Mahal
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यात ताजमहालसारखे दिसणारे एक आलिशान घर दिसून येत आहे. विशेष म्हणजे, हे कुठलेही हॉटेल किंवा पर्यटनस्थळ नाही, तर एका प्रेमळ जोडप्याचं खाजगी निवासस्थान आहे. हे 4BHK घर मध्य प्रदेशातील बुरहानपूर शहरात स्थित असून, व्यापारी आनंद प्रकाश चौकसे यांनी आपल्या पत्नीच्या प्रेमात हे घर बांधलं आहे.
या व्हिडिओमध्ये दिसणारे हे घर खऱ्या ताजमहालसारखं दिसत आहे. घराभोवतीची सुंदर कोरीवकाम, भव्य घुमट, कमानीदार दरवाजे आणि संपूर्ण रचना पाहणाऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.
या व्हिडिओमध्ये इंस्टाग्राम युजर प्रियम सारस्वत या जोडप्याशी संवाद साधताना दिसत आहे. ते विचारतात, “हे खरंच तुमचं घर आहे का? आणि हे ताजमहालसारखं आहे का?” त्यावर हसत हसत दोघंही “होय” असं उत्तर देतात. यानंतर जेव्हा विचारण्यात येतं की हे घर पत्नीला समर्पित आहे का, तेव्हा चौकसे उत्तर देतात, “१००% माझ्या पत्नीसाठी.
व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय, हे सुंदर घर इंदूरजवळ आहे आणि प्रेम पसरवण्याच्या उद्देशाने बांधलं गेलं आहे. सर्वात खास बाब म्हणजे हे घर एका शाळेच्या परिसरात उभारलं आहे, जी चौकसे यांनी सुरू केली आहे.
हा व्हिडिओ आतापर्यंत ५.९ दशलक्षाहून अधिक वेळा पाहिला गेला असून, नेटिझन्सकडून भरभरून प्रतिक्रियाही येत आहेत. काही युजर्सनी याला “संगमरवरात कोरलेली कविता” म्हटलं आहे, तर काहींनी लिहिलंय, “हे फक्त घर नाही, हे प्रेमाचं जिवंत प्रतीक आहे.” अनेकांनी या कल्पनेला प्रेरणादायी ठरवत लिहिलं – “प्रेम शब्दांनी नाही, वारशाने व्यक्त करा!”
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.