Viral Video: बंगळुरुमधील 'या' धक्कादायक व्हिडिओने उडवली झोप; कार चालकाचा निर्दयीपणा...

Bengaluru Road Rage Viral Video: बंगळुरुमध्ये घडलेल्या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Viral Video
Viral VideoDainik Gomantak
Published on
Updated on

Bengaluru Road Rage Viral Video: बंगळुरुमध्ये घडलेल्या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक व्यक्ती गाडीच्या बोनेटला लटकत आहे आणि कार भरधाव वेगाने धावत आहे. कार चालकाने गजबजलेल्या रस्त्यावर लटकलेल्या व्यक्तीला सुमारे अर्धा किलोमीटर ओढत नेले.

दरम्यान, रस्त्यावरील वर्दळ व्हिडिओमध्ये दिसत आहे. दरम्यान, एक व्यक्ती कारला लटकलेली दिसत असून कार भरधाव वेगाने रस्त्यावर धावत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना बंगळुरुच्या मरम्मा टेम्पल सर्कलजवळ घडली. मुनीर असे पीडित तरुणाचे नाव आहे. दोन गाड्यांमध्ये टक्कर झाली, एक कार मुनीर नावाच्या व्यक्तीची असल्याचे सांगण्यात आले. त्याने दुसरी कार थांबवण्याचा प्रयत्न केला असता कार चालक गाडी थांबवण्याऐवजी पळू लागला. यानंतर मुनीर गाडीच्या बोनेटवर चढला. मात्र, त्यानंतरही त्या व्यक्तीने आपली कार थांबवली नाही. तसेच त्याला सुमारे अर्धा किलोमीटर ओढत नेले.

Viral Video
Viral Video: "कुत्ते की रखवाली, इंसानियत की तबाही..." नोएडामध्ये पुन्हा कुत्र्यावरुन भांडण, महिलेकडून एकाला मारहाण

दुसरीकडे, काही वाटसरुंनी मुनीरला गाडीवर लटकताना पाहिल्यावर त्यांनी गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला आणि त्यात त्यांना यश आले. कार चालकाने कार थांबवली आणि मुनीरचा जीव वाचला. ही घटना 15 जानेवारीला घडली होती, ज्याचा व्हिडिओ 23 जानेवारीला सोशल मीडियावर व्हायरल झाला.

Viral Video
Viral Video: दोषी ठरवल्याने आरोपीचा न्यायाधीशांवरच हल्ला, टेबलवरून उडी मारत केली बेदम मारहाण

दरम्यान, पोलीस आता या प्रकरणाचा तपास करत असून आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मात्र, या घटनेत मुनीर जखमी झाला आहे की नाही हे स्पष्ट झालेले नाही. याआधी 17 जानेवारी रोजी उत्तर प्रदेशच्या राजधानीतून असाच एक प्रकार उघडकीस आला होता, ज्यामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याला एका कार चालकाने खूप अंतरापर्यंत ओढूत नेले होते. रेल्वे क्रॉसिंग बंद असल्याने त्याचा जीव वाचला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com