Allahabad University: उत्तर प्रदेशातील अलाहाबाद विद्यापीठात विद्यार्थी लिडर आणि सुरक्षारक्षक यांच्यात खडाजंगी झाली आहे. किरकोळ वादानंतर दोघांमध्ये हाणामारी झाली. यादरम्यान गोळीबाराच्या बातम्याही आल्या आहेत. वाढता गोंधळ पाहता घटनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. विद्यापीठातील विद्यार्थी नेत्यांनी अलाहाबाद विद्यापीठाच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याचा आरोप केला आहे. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
दरम्यान, विद्यार्थी (Students) आणि सुरक्षारक्षक यांच्यात झालेल्या या मारामारीत अनेक विद्यार्थी जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, विद्यार्थी आणि सुरक्षारक्षकांमध्ये दगडफेक झाली. त्याचवेळी विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी सुरक्षारक्षकांवर गोळीबार केल्याचा आरोप केला आहे. हाणामारीत जाळपोळ झाल्याची बातमी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विद्यापीठात विद्यार्थी संघटना पुनर्स्थापित करण्यासाठी विद्यार्थी आंदोलन करत होते. यावेळी सुरक्षारक्षकांसोबत बाचाबाची झाली.
चकमकीदरम्यान, कॅम्पसचीही तोडफोड करण्यात आली. अनेक वाहने जाळण्यात आली. कॅम्पसमध्ये उपस्थित असलेल्या वाहनांच्या काचाही फोडण्यात आल्या. प्रत्यक्षात सुट्टीच्या दिवशीही विद्यार्थी विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेच्या इमारतीचे कुलूप उघडण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या सुरक्षारक्षकांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र ते मान्य न झाल्याने वाद सुरु झाला. काही वेळातच या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले.
मात्र, पोलिसांनी (Police) हे प्रकरण हाताळताना विद्यार्थ्यांना काही काळ शांत केले. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रयागराजचे पोलीस आयुक्त रमित शर्माही घटनास्थळी पोहोचले आहेत.
गोंधळ का झाला?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांनी फी वाढीविरोधात अलाहाबाद विद्यापीठ परिसरात निदर्शने केली. यावेळी आंदोलकांनी मोटारसायकल जाळली, कारचे नुकसान केले. उत्तर प्रदेशचे एडीजी प्रशांत कुमार यांनी सांगितले की, परिस्थिती आता नियंत्रणात आहे. सीपी प्रयागराज यांच्यासह इतर अधिकारी घटनास्थळी उपस्थित आहेत. पोलिस परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.