पत्नीच्या प्रेमात हतबल, प्रियकराला समुद्राच्या मध्यभागी केली अटक

समुद्रमार्गे सुमारे 2000 किमीचा प्रवास करून मुंबईत राहणाऱ्या पत्नीला भेटायचे होते
vietnamese man rescued off thailand in attempt to row to india to see his wife in a rubber dinghy
vietnamese man rescued off thailand in attempt to row to india to see his wife in a rubber dinghyDainik Gomantak
Published on
Updated on

भारतात राहणाऱ्या आपल्या पत्नीला भेटण्यासाठी एका व्यक्तीने थायलंड सोडले. त्याने दोन आठवडे समुद्रात प्रवास केला. तो म्हणजे चक्क थायलंडच्या किनाऱ्यापासून 50 मैल. त्यानंतर थायलंडच्या नौदलाला त्याची माहिती मिळाली. त्याची सुटका करून नंतर अटक करण्यात आली.

हो होआंग हंग असे या व्यक्तीचे नाव आहे. तो व्हिएतनामचा रहिवासी आहे. फुकेत बेटाच्या थाई हॉलिडे बेटावरून त्यांनी प्रवास सुरू केला. समुद्रमार्गे सुमारे 2000 किमीचा प्रवास करून मुंबईत राहणाऱ्या आपल्या पत्नीला भेटायचे होते. पाणी आणि इन्स्टंट नूडल्स घेऊन तो रबर डिंगीतून प्रवासाला निघाला. मात्र, त्यात कोणतीही नेव्हिगेशन यंत्रणा नव्हती. होआंग थायलंडपासून 80 किलोमीटर अंतरावर असलेल्या सिमिलन बेटांच्या जवळ पोहोचला होता. जिथे त्याला काही मच्छिमारांनी पाहिले आणि नंतर नौदलाच्या (Navy) मरीन सिक्युरिटी युनिटला याबद्दल सांगितले. त्यानंतर नौदलाच्या जवानांनी त्याला वाचवले.

vietnamese man rescued off thailand in attempt to row to india to see his wife in a rubber dinghy
...म्हणून बीएसएफ जवानांनी 'या' मुलीला दिले पाक रेंजर्सच्या ताब्यात

थाई मेरिटाइम एन्फोर्समेंट कमांड सेंटरचे कॅप्टन पिचेट सॉन्गटान यांनी दिलेल्या माहितीनुसार, हंगने सांगितले की, तो मुंबईत (Mumbai) काम करणाऱ्या आपल्या पत्नीकडे जाण्याचा प्रयत्न करत होता. कोविडमुळे तो दोन वर्षांपासून पत्नीपासून दूर आहे.

पिशेट म्हणाले - व्यक्तीकडे नकाशा, कंपास, जीपीएस किंवा कपडे नव्हते. त्याच्याकडे फक्त पिण्यासाठी मर्यादित पाणी होते.

होआंग यापूर्वी बँकॉकला (Bangkok) गेला होता. पण तिथे त्याला कळलं की व्हिसाशिवाय तो तिथून भारतात जाऊ शकत नाही. त्यानंतर त्यांनी बसने फुकेत गाठले. जिथे त्याने एक कयाक विकत घेतला.

होआंगने 5 मार्च रोजी फुकेत किनारपट्टी सोडली. मात्र विरुद्ध दिशेकडून वाहणाऱ्या वाऱ्यात तो अडकला. यामुळे, तो 2 आठवड्यात खूप कमी अंतर पार करू शकला आणि तो सापडला. अधिक तपासासाठी होआंगला फुकेत येथे आणण्यात आल्याचे थाई अधिकाऱ्यांनी सांगितले. पिचेट म्हणाले- आम्ही व्हिएतनाम आणि भारताच्या दूतावासांशी संपर्क साधला आहे, परंतु अद्याप कुठूनही प्रतिसाद मिळालेला नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com