हिंसाचाराच्या आदल्या दिवशीचा व्हिडिओ आला समोर

हिंसाचाराच्या एक दिवस आधीचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये काही लोक लाठ्या जमा करत आहेत. 15 एप्रिलच्या सीसीटीव्हीचे हे फुटेज राज 2:11 मिनिटांचे आहे.
A video of the day before the delhi violence surfaced
A video of the day before the delhi violence surfacedDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

दिल्ली: जहांगीरपुरी हिंसाचार प्रकरणात दररोज अटक आणि नवनवे खुलासे होत आहेत. पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत. दरम्यान, हिंसाचाराच्या एक दिवस आधीचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये काही लोक लाठ्या जमा करत आहेत. 15 एप्रिलच्या सीसीटीव्हीचे हे फुटेज राज 2:11 मिनिटांचे आहे.

(A video of the day before the delhi violence surfaced)

A video of the day before the delhi violence surfaced
PM मोदींची मिमिक्री करणं पडलं महाग! जबलपूर पोलिसांनी तरुणाला केलं गजाआड

15 एप्रिलच्या जहांगीर पुरीच्या या सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिस (Delhi police) कटाच्या तपासात गुंतले आहेत. सीसीटीव्ही समोर आल्यानंतर मिरवणुकीदरम्यान दंगलीचा कट अगोदरच तयार केला जात होता, असे काही संकेत पोलिसांना मिळत आहेत. या सीसीटीव्ही फुटेजनंतरच पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा हे लोक लाठ्या गोळा करत होते, तेव्हा स्थानिक लोकांनी विरोध केला, त्यानंतर किरकोळ हाणामारी (Delhi Violence) झाली. त्यामुळे दिल्ली पोलिसांकडून स्थानिक लोकांचे जबाबही नोंदवले जातील, जेणेकरून खटला न्यायालयात भक्कमपणे ठेवता येईल. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या व्हिडिओचाही तपास केला जात असून, लोकांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

विशेष म्हणजे, दिल्ली पोलिसांनी आपला प्राथमिक तपास अहवाल केंद्रीय गृह मंत्रालयाला सादर केला आहे. या अहवालात संपूर्ण घटनेची माहिती देताना दिल्ली पोलिसांनी केलेल्या कारवाईची माहिती देण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जहांगीरपुरी हिंसाचारप्रकरणी केंद्रीय गृहमंत्रालयाला दिल्ली पोलिसांकडून अहवाल प्राप्त झाला आहे. (Delhi Violence Latest Update)

A video of the day before the delhi violence surfaced
''मामा जरा जपून-जपून'' लग्नसमारंभात 'सरकार' चा जिन्यावरुन गेला तोल, पाहा VIDEO

या घटनेची माहिती देताना दिल्ली पोलिसांनी सांगितले की, ही घटना असामाजिक तत्वांच्या सुनियोजित कटाचा भाग होती, जी दिल्ली पोलिसांनी वेळीच उधळून लावली. दिल्ली पोलिसांनी या वृत्तात सांगितले आहे की, या प्रकरणाची सर्व बाजूंनी चौकशी केली जात असून या प्रकरणात आतापर्यंत एकूण 24 जणांना अटक करण्यात आली आहे.

अटक करण्यात आलेल्या लोकांमध्ये 21 प्रौढ आणि तीन अल्पवयीनांचा समावेश आहे. यातील एक व्यक्ती आधी प्रौढ असल्याचे सांगण्यात आले होते, परंतु जेव्हा त्याच्या कुटुंबीयांनी तो अल्पवयीन असल्याची कागदपत्रे पोलिसांकडे सादर केली तेव्हा त्याला बालसुधारगृहात पाठवण्यात आले. यापूर्वी या प्रकरणात केवळ दोन अल्पवयीन मुलांना अटक करण्यात आली होती. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी एकूण 8 जण जखमी झाले असून, या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे. मशिदीवर भगवा फडकवल्याची चर्चा पूर्णपणे निराधार असल्याचे स्पष्टीकरणही दिल्ली पोलिसांनी दिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Supreme Court Delhi barricades
Viral Video
Navratri 2026 wishes in Marathi
Election Commission Form 7 Rules 2026
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com