Gyanvapi Masjid Case: मुस्लिम बाजूचे वकील अभय यादव यांचे हृदयविकाराने निधन

Gyanvapi Masjid Case News: ज्ञानवापी मशीद आणि शृंगार गौरी खटल्यातील मुस्लिम बाजूचे वकील अभय यादव यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
Gyanvapi Masjid Case
Gyanvapi Masjid CaseDainik Gomantak
Published on
Updated on

वाराणसीच्या ज्ञानवापी मशीद प्रकरणाशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. या खटल्यातील मुस्लिम पक्षाचे वकील अभयनाथ यादव (Abhay Yadav) यांचा मृत्यू झाला आहे. अंजुमन इंतजामिया कमिटीचे वकील अभय नाथ यादव यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. रविवारी संध्याकाळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

* सहकारी वकिलाने दिली माहिती
ज्ञानवापी मशीद प्रकरणात त्यांचे सहकारी वकील नित्यानंद राय यांनी अभय नाथ यादव यांच्या मृत्यूची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास अभयनाथ यादव यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना जवळच्या त्रिमूर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्याला शिवम रुग्णालयात नेण्यात आले. तेथे रुग्णालयातील डॉक्टरांनी अभयनाथ यादव यांना मृत घोषित केले. त्यानंतर रात्री उशिरा वकिलाचा मृतदेह घरी आणण्यात आला. मात्र, त्यांच्या पार्थिवावर अद्याप अंत्यसंस्कार झालेले नाहीत.

Gyanvapi Masjid Case
10 वर्षांनंतरही भारतातील गरीब वृद्धांना महिन्याला मिळते फक्त 300 रुपये पेन्शन

कोण आहे अभय नाथ यादव

वकिलाच्या मुलीचे 22 जून रोजी लग्न झाले होते. अभयनाथ यादव यांच्यावर आता मुलगी आल्यानंतरच अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ज्ञानवापी मशीद आणि शृंगार गौरी प्रकरणात नियमित दर्शन पूजा करण्याची मागणी करण्यात आली आहे. ज्यामध्ये अंजुमन व्यवस्था समिती मुस्लिमांची बाजू मांडत आहे. अभयनाथ यादव हे या समितीचे प्रमुख वकील होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com