Vadodara Jarod Highway Accident: वडोदरा-जरोद हायवेवर काळजाचा थरकाप! लक्झरी बस आणि ट्रकच्या धडकेत 6 प्रवाशांचा जागीच मृत्यू, 31 गंभीर जखमी

Luxury Sleeper Bus Truck Collision Gujarat: गुजरातमधील वडोदरा-जरोद महामार्गावर बुधवारी (17 जून) पहाटेच्या सुमारास एक अत्यंत भीषण रस्ते अपघात घडल्याची धक्कादायक घटना समोर आली.
Luxury Sleeper Bus Truck Collision Gujarat
Vadodara Jarod Highway AccidentDainik Gomantak
Published on
Updated on

Vadodara Jarod Highway Accident: गुजरातमधील वडोदरा-जरोद महामार्गावर बुधवारी (17 जून) पहाटेच्या सुमारास एक अत्यंत भीषण रस्ते अपघात घडल्याची धक्कादायक घटना समोर आली. कोटंबी गावाजवळ महामार्गावरुन जाणाऱ्या एका वेगवान लक्झरी बसने पुढे चाललेल्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, बसच्या दर्शनी भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला. या काळजाचा थरकाप उडवणाऱ्या अपघातामध्ये बसमधील 6 प्रवाशांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला असून, अन्य 31 प्रवासी गंभीररित्या जखमी झाले.

अपघाताच्या (Accident) वेळी बसमध्ये एकच खळबळ उडाली. अपघाताचा प्रचंड मोठा आवाज ऐकून परिसरातील स्थानिक नागरिक तातडीने मदतीसाठी घटनास्थळाकडे धावले.

Luxury Sleeper Bus Truck Collision Gujarat
Accident News: गोव्याची सहल ठरली अखेरची; सोलापूरजवळ भीषण अपघात, दोन जिवलग मित्रांचा मृत्यू

या घटनेची माहिती मिळताच स्थानिक जरोद पोलीस आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे (NDRF) जवान घटनास्थळी दाखल झाले. बसची अवस्था अत्यंत दयनीय झाल्यामुळे अनेक प्रवासी आतमध्ये अडकून पडले होते. एनडीआरएफच्या जवानांनी युद्धपातळीवर बचावकार्य राबवून बसचे पत्रे कापून आत अडकलेल्या प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढले. सर्व जखमी प्रवाशांना तात्काळ उपचारासाठी वडोदरा येथील प्रसिद्ध सयाजी रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

Luxury Sleeper Bus Truck Collision Gujarat
Goa Accident: रस्‍ता चुकला, घात झाला; अपघातात दाम्‍पत्‍याचा मृत्‍यू, कारची दुचाकीला धडक, बांबोळीतील घटना

पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह ताब्यात घेतले असून ते पोस्टमार्टमसाठी रुग्णालयात पाठवून दिले आहेत. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. पोलिसांनी क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त बस आणि ट्रक रस्त्यावरुन बाजूला सारुन महामार्गावरील वाहतूक पूर्ववत केली. हा अपघात नेमका ड्रायव्हरला डुलकी लागल्यामुळे झाला की वाहनाचा वेग जास्त असल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले, याचा शोध जरोद पोलीस घेत असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com