कोव्हॅक्सिन लस
कोव्हॅक्सिन लसDainik Gomantak

Vaccination: भारत बायोटेकची मोठी घोषणा...

कंपनीने या लहान वयोगाटातील मुलांच्या व्हॅक्सिनची ट्रायल पूर्ण केली आहे. परंतु भारतात अद्याप लहान मुलान वयोगटातील मुलांच्या लसीकरणाची सुरुवात झाली नाही.

दिल्ली: सद्या देशात कोरोनाच्या (covid 19)लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी केंद्र सरकारचा (Central Government)प्रयत्न सुरु आहे. जास्तीत जास्त नागरिकांना लस मिळावी यासाठी देशात वेगवेगळी अभियाने राबवली जात आहेत. यामध्ये लसीचे डोस नागरिकांना कमी पडू नये, यासाठी सरकारकडून खबरदारीही घेतली जात आहे.

दरम्यान, भारत बायोटेककडून नागरिकांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. कोव्हॅक्सिन लसीचे उत्पादन सुमारे 2 कोटींनी वाढून लसीचा (Vaccine)पुरवठा मोठ्या प्रमाणात करणार असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे. तसेच देशातील अत्यंत महत्त्वाचे म्हणजे लहान मुलांच्या लसीच्या चाचणी. याबद्दलही कंपनीने मोठी घोषणा केली आहे.

कोव्हॅक्सिन लस
भारतात कोरोना लसीकरणाचा आकडा 70 कोटी पार; 13 दिवसात टोचले 10 कोटी डोस

यावेळी भारत बायोटेकने कंपनीने सांगितले आहे की, कोव्हॅक्सिन (Covaxin) लसीचे उत्पादन वाढून ते सुमारे 2 कोटीने वाढवणार आहेत. आता 'भारत बायोटेक कडून 3.5 कोटी डोसचे उत्पादन घेतली जात आहे. कोव्हॅक्सिनचे उत्पादन वाढल्यानंतर भारत बायोटेक आता 5.5 कोटी लसीचे उत्पादन करेल'. तसेच जर कोरोनाची तिसरी लाट आली तर लहान मुलांना सर्वाधिक धोका असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळे कंपनीने याबाबतही आनंदाची बातमी जाहीर केली आहे.

भारत बायोटेक कंपनी ही कोव्हॅक्सिनची(Covacin) लहान मुलांवर चाचणी सुरु होती. आता ती चाचणी पूर्ण झालेली आहे. या कंपनी लहान मुलांवरील चाचणीचा संपूर्ण डेटा पुढील आठवड्यात ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DGCI) यांच्याकडे देणार आहे. विशेषबाब म्हणजे एक दिवस अगोदर फायजर कंपनीने दावा केलाय की, फायजर लस ही 5 ते 11 वर्षाच्या वयोगटातील मुलांसाठी प्रभावी आणि योग्य आहे. कंपनीने या लहान वयोगाटातील मुलांच्या व्हॅक्सिनची ट्रायल पूर्ण केली आहे. परंतु भारतात अद्याप लहान मुलान (Small children)वयोगटातील मुलांच्या लसीकरणाची सुरुवात झाली नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com