Uttarkashi Cloudburst: उत्तरकाशीतील धरालीमध्ये ढगफुटी, अनेक घरं गेली वाहून; 4 जणांचा मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO

Uttarkashi Cloudburst Video: सध्या देशाच्या अनेक भागात निसर्गाचा प्रकोप दिसून येत आहे. डोंगरांवर सतत पडणाऱ्या पावसामुळे हाहाकार माजू लागला आहे.
Uttarkashi Cloudburst Video
Uttarkashi Cloudburst VideoDainik Gomantak
Published on
Updated on

सध्या देशाच्या अनेक भागात निसर्गाचा प्रकोप दिसून येत आहे. डोंगरांवर सतत पडणाऱ्या पावसामुळे हाहाकार माजू लागला आहे. दरम्यान, उत्तराखंडमधील उत्तरकाशीमधून ढगफुटीची बातमी समोर आलीय. मंगळवारी (५ ऑगस्ट) गंगोत्री धाम आणि मुखवा जवळील धाराली गावात ढगफुटीमुळे मोठे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे.

धराली गावात ढगफुटी झाल्यामुळे अचानक आलेल्या पुरामुळे अनेक घरे वाहून गेली. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. जो पाहून कोणाचेही अंगावर काटा येईल. या पुरात अनेक घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचे सांगितले जात आहे.

Uttarkashi Cloudburst Video
Goa Crime: रस्त्यावर अडवून बेदम मारहाण, 12 लाखांचे दागिने - मोबाईल पळवला; जखमी 'अंकल'च्या पार्श्वभूमीमुळे वाढली गुंतागुंत

उत्तरकाशीतील धराली येथे झालेल्या ढगफुटीच्या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जो तिथे उपस्थित असलेल्या काही स्थानिक लोकांनी त्यांच्या मोबाईल फोन कॅमेऱ्याने रेकॉर्ड केला आहे.

व्हिडिओमध्ये असे दिसून येते की अचानक दरीत वसलेल्या गावातील उंच पर्वतांमधून पाण्याचा प्रवाह वेगाने वाहत आहे. पाण्यासोबत कचराही वाहत आहे. हे पाहून तिथे उपस्थित असलेले लोक ओरडू लागतात. काही वेळातच पुरामुळे गावातील अनेक घरे वाहून जातात.

Uttarkashi Cloudburst Video
Goa Electricity: 5000 कोटी खर्चूनही वीज समस्या कायम! सरदेसाईंचा घणाघात; लाईनमनना विमा संरक्षण देण्याची केली मागणी

या घटनेत ४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीय. तर अनेक जण बेपत्ता असल्याची माहिती आहे. सध्या युद्धपातळीवर मदत कार्य सरू असल्याची माहिती उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी दिलीय. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com