Uttar Pradesh Car Accident: ...अन् काही सेकंदात सगळं संपलं! मुझफ्फरनगरमध्ये कार जळून खाक, 6 जणांचा होरपळून मृत्यू; वेगाची किंमत प्राणांनी चुकवली

Muzaffarnagar Car Accident News: उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमध्ये सोमवारी (11 नोव्हेंबर) सकाळी काळजाचा ठोका चुकवणारी भीषण दुर्घटना घडली.
Muzaffarnagar Car Accident News
Uttar Pradesh Car AccidentDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Muzaffarnagar Car Accident News: उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमध्ये सोमवारी (11 नोव्हेंबर) सकाळी काळजाचा ठोका चुकवणारी भीषण दुर्घटना घडली. पानिपत-खटिमा राष्ट्रीय महामार्गावर जागाहेडी गावाजवळ एका अनियंत्रित भरधाव कारची महामार्गावरील विजेच्या खांबाला जोरदार धडक बसली. ही धडक इतकी भीषण होती की, धडक लागताच कारने क्षणार्धात पेट घेतला. आगीच्या रौद्ररुपाने संपूर्ण कारला आपल्या विळख्यात घेतल्यामुळे आत बसलेल्या प्रवाशांना बाहेर पडण्याची साधी संधीही मिळू शकली नाही. या दुर्घटनेत कारमधील सर्व 6 जणांचा आगीत जिवंत जळून करुण अंत झाला असून या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी ही कार पानिपत-खटिमा नॅशनल हायवेवरुन वेगाने जात होती. जागाहेडी उड्डाणपुलाजवळ अचानक चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या विजेच्या खांबाला जाऊन धडकली. धडकेचा आवाज इतका प्रचंड होता की, आसपासचे लोक मदतीसाठी धावले, परंतु कारला तात्काळ भीषण आग (Fire) लागल्याने कोणालाही जवळ जाणे शक्य झाले नाही. आगीच्या ज्वाळांनी संपूर्ण कार वेढल्यामुळे कारचे दरवाजे लॉक झाले आणि प्रवाशांचा आतच होरपळून मृत्यू झाला.

Muzaffarnagar Car Accident News
Accident Death: तन्मयची दिवाळी ठरली अखेरची! डिचोलीत भीषण अपघातात 22 वर्षीय युवकाचा मृत्यू

या दुर्घटनेची बातमी वाऱ्यासारखी पसरताच स्थानिक पोलीस आणि अग्निशामक दलाच्या गाड्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करुन आगीवर नियंत्रण मिळवले, परंतु तोपर्यंत कार पूर्णपणे जळून खाक झाली होती. पोलिसांनी मृतदेह कारमधून बाहेर काढून पोस्टमार्टमसाठी पाठवले असून त्यांची ओळख पटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. महामार्गावर झालेल्या या भीषण अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. वेगावरील नियंत्रण सुटल्यामुळे निष्पाप 6 जणांना आपला जीव गमवावा लागल्याने पानिपत-खटिमा महामार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.