Kanpur Crime: कानपूरमध्ये 6 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; प्रतिकार करताच मुलीच्या तोंडात कोंबली पाने, डोक्यात घातली वीट

Uttar Pradesh Crime News: रक्तबंबाळ अवस्थेत असलेल्या पीडित मुलीला तिथेच टाकून संशयिताने घटनास्थळावरुन पळ काढला, असे तक्रारीत म्हटले आहे.
Uttar Pradesh Kanpur crime Man sexually assaulted 6-Year-Old
Uttar Pradesh Crime NewsDainik Gomantak
Published on
Updated on

उत्तर प्रदेश: कानपूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सहा वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला असून, तिने प्रतिकार करताच तिच्या तोंडात झाडाची पाने कोंबण्यात आली व डोक्यात वीटेने माराहण करुन जखमी केली. मुलगी मृत झाल्याचे समजून संशयित आरोपीने घटनास्थळावरुन पळ काढला.

पीडित मुलीच्या घरच्यांना घटनेची माहिती मिळताच एकच खळबळ उडाली. मुलीला उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्यानंतर जिल्हा रुग्णालयात तिला हलविण्यात आले. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंद करुन तपासास सुरुवात केली आहे.

Uttar Pradesh Kanpur crime Man sexually assaulted 6-Year-Old
Goa Assembly Monsoon Session 2025: गोवा विधानसभा पावसाळी अधिवेशनाची तारीख जाहीर, जुलैमध्ये 'या' दिवसांपासून सुरु होणार

पीडित मुलीच्या वडिलांनी याप्रकरणी पोलिसांत लेखी तक्रार दाखल केली आहे. घराच्या शेजारी राहणारा व्यक्ती मुलीला चॉकलेट देतो असे सांगत सोबत घेऊन गेला. संशयित व्यक्तीने मुलीवर लैंगिक अत्याचार केला.

मुलगी वेदनेने विव्हळत असताना नराधमाने तिच्या तोंडात झाडाची पाने कोंबली, तरीही ती थांबत नसल्याने तिच्या डोक्यावर वीटेने जोरदार प्रहार केला. रक्तबंबाळ मुलीला तिथेच टाकून संशयिताने घटनास्थळावरुन पळ काढला, असे तक्रारीत म्हटले आहे.

पीडित मुलीची प्रकृती चिंताजनक

पीडित मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहताच गावकऱ्यांनी घटनेची माहिती तिच्या नातेवाईकांना दिली. कुटुंबीय घटनास्थळी दाखल झाल्यानंतर मुलीला घातमपूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी तिला कानपूर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Uttar Pradesh Kanpur crime Man sexually assaulted 6-Year-Old
Goa Monsoon 2025: गोव्यात गुरुवारी रेड अलर्ट, मुसळधार पावसाचा इशारा; आठवडाभर राहणार पाऊस

कुटुंबीयांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंद केला असून, याप्रकरणी अधिक तपास केला जात आहे. संशयित व्यक्ती पीडित मुलीच्या घराजवळ राहत होता आणि मुलगी संशयिताला काका म्हणून हाक मारायची.

चॉकलेटचे आमिष दाखवून संशयिताने तिच्या लैंगिक अत्याचार केल्याची माहिती पोलिसांनी एका स्थानिक वृत्तपत्राला दिली आहे. दरम्यान, संशयिताचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विविध टीम तयार केल्या असून, त्याचा शोध घेतला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com