Double Murder Case: 'माझ्या डोळ्यांदेखत आई आणि बहिणीचा बापानं घेतला जीव!', कौटुंबिक वादातून गाझियाबादमध्ये थरार; 14 वर्षांच्या चिमुकलीनं सांगितली आपबिती

Ghaziabad Double Murder Case: लखनऊ येथील दुहेरी हत्याकांडाची घटना ताजी असतानाच आता गाझियाबादमधील खोडा कॉलनीत अशाच एका धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरुन गेला.
Ghaziabad Double Murder Case
Double Murder CaseDainik Gomantak
Published on
Updated on

Ghaziabad Double Murder Case: लखनऊ येथील दुहेरी हत्याकांडाची घटना ताजी असतानाच आता गाझियाबादमधील खोडा कॉलनीतील अशाच एका धक्कादायक घटनेने हादरवून सोडले. नवऱ्याने कौटुंबिक वादातून बायको आणि 15 वर्षांच्या चिमुकल्या मुलीची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली. एवढेच नाही तर या नराधमाने आपल्या 14 वर्षांच्या दुसऱ्या मुलीवरही जीवघेणा हल्ला केला. मात्र, ती सुदैवाने या हल्ल्यातून वाचली. तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही थरारक घटना खोडा कॉलनीतील बिहार गल्ली क्रमांक-3 मधील एका इमारतीच्या चौथ्या मजल्यावर शनिवारी मध्यरात्री घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी मध्यरात्री 12:15 वाजण्याच्या सुमारास खोडा पोलीस ठाण्याला या घटनेची माहिती मिळाली. माहिती मिळताच इंदिरापुरमचे सहाय्यक पोलीस आयुक्त सूर्यबली मौर्य यांच्यासह पोलीस पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. तपासादरम्यान बीबी तबस्सुम आणि त्यांची 15 वर्षांची मुलगी सना तबस्सुम यांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या 14 वर्षांच्या रुबी तबस्सुम या दुसऱ्या मुलीला पोलिसांनी तातडीने एमजी रुग्णालयात दाखल केले असून, सध्या तिची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे.

Ghaziabad Double Murder Case
Crime News: सहा वर्षांच्‍या मुलीची साक्ष ग्राह्य; पतीच्या खूनप्रकरणी पत्नीचा जामीन अर्ज फेटाळला

या प्रकरणी पोलिसांनी (Police) हत्येचा आरोपी आणि मृत महिलेचा पती राजा अन्सारी याला तात्काळ ताब्यात घेतले. आरोपी राजा हा मूळचा बिहारच्या अररिया जिल्ह्यातील रहिवासी असून, तो आपल्या कुटुंबासह खोडा कॉलनीत भाड्याच्या घरात राहत होता. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा केला असून ते पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत. कौटुंबिक वादातून हे हत्याकांड घडल्याचा संशय व्यक्त केला जात असला, तरी हत्येचे मुख्य आणि मूळ कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस आरोपी राजा अन्सारीची कसून चौकशी करत असून याप्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com