उत्तर प्रदेशातही काका पुतण्यांचा राजकीय 'वॉर', शिवपाल यादवांचा भाजपवरही हल्लाबोल

शिवपाल यादव यांनी भाजपचेसारे लोक एकच आहेत, ते फक्त गोळ्या झाडू शकतात . ते एखाद्याच्या आयुष्याची कमाई वाया घालवातात असा जोरदार प्रहार केला आहे.
Uttar Pradesh Assembly Election: Shivapal Yadav attacks on Akhilesh Yadav & BJP
Uttar Pradesh Assembly Election: Shivapal Yadav attacks on Akhilesh Yadav & BJPDainik Gomantak
Published on
Updated on

उत्तर प्रदेशचे (Uttar Pradesh) राजकारण निवडणुकीच्या आधीच तापताना दिसत आहे. उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीला (Uttar Pradesh Assembly Election) आणखीन बराचसा अवधी असतानाही सारेच पक्ष झाडून कामाला लागलेले पाहायला मिळत आहेत. टीका-टिप्पणी, आरोप-प्रत्यारोप युती आघाड्या या साऱ्यांनीच राजकारण तापून निघत आहे. त्यातच समजवादी पार्टीचे (Samajwadi Party) नेते अखिलेश यादव (Akhilesh Yadav) आणि त्यांचे काका प्रगतिशील समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवपाल यादव (Shivapal Yadav), यांच्यातही अनेकवेळेस वाद होत आहेत. (Uttar Pradesh Assembly Election: Shivapal Yadav attacks on Akhilesh Yadav & BJP)

यूपीच्या फतेहपूर जिल्ह्यात सामाजिक परिवर्तन रथयात्रा आणणाऱ्या कामगारांचे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना प्रगतिशील समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवपाल यादव यांनी आग्रा येथील घटनेवर मोठे वक्तव्य करताना सांगितले की, आग्रा येथे एका सफाई कामगाराला पोलिसांनी बेदम मारहाण केली आणि त्यात त्याचा जीव गेला.जर तो जिवंत राहिला असता तर सगळ्यांचे पितळ उघडे पडले असते असा आरोप देखील त्यांनी केला आहे.

शिवपाल यादव यांनी भाजपचेसारे लोक एकच आहेत, ते फक्त गोळ्या झाडू शकतात . ते एखाद्याच्या आयुष्याची कमाई वाया घालवातात .भाजपाच्या लोकांना फक्त मारायला येत असं म्हणत त्यांनी भाजपवर जोरदार प्रहार केला आहे.

तसेच आपल्या पुतण्याला म्हणजेच अखिलेश यादव यांना लक्ष करत आम्ही समाजवादी पक्षात होतो, तेव्हा पक्ष उंचीवर होता. किती वेळा सरकार स्थापन झाले? नेताजी दोन वेळा पंतप्रधान होता होता राहिले जर समाजवादी आणि अखिलेशने माझ्याबरोबर काम केले असते, तर आज समाजवादी पक्ष हा देशातील नंबर 1 पक्ष किंवा नंबर 2 आणि भारतीय जनता पार्टी येथे नसती. माझ्या थांबण्याने फरक पडला असता आणि देशातील चार राज्यांमध्ये सपाचे सरकार असते.असे म्हणत त्यांनी अखिलेश यांच्या नेतृत्वावरच प्रश्न उपस्थित केला आहे.

भाजपवर हल्ला चढवत शिवपाल यादव म्हणाले की, भाजप सरकारने त्यांचा विश्वास पूर्णपणे गमावला आहे. त्यांच्या सरकारने जनतेसाठी काही केले नाही, फक्त मोठीआश्वासने दिली. राज्यात उमेदवार उभे करण्याच्या प्रश्नावर ते म्हणाले की, युतीची चर्चा सध्या सुरू आहे. आमचे पहिले प्राधान्य समाजवादी पक्ष असल्याचं सांगत त्यांनी सापाला युतीसाठी आमंत्रण देखील दिले आहे. युती झाल्यावर जागाही विभागल्या जातील. जिथे पुरोगामी समाजवादी पक्ष आहे, तिथे त्याचे स्वतःचे सरकार असेल.त्याचबरोबर भाजप केवळ नाव बदलणाऱ्यांचं सरकार असल्याचा हल्लबोल ही त्यांनी योगी सरकारवर केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com