यूपीत महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी सपा नेत्याला अटक; फोटो काढण्यास विरोध केल्याने सहकाऱ्यांना मारहाण

धमक्या देत परवानाधारक शस्त्रांनी गोळीबार करत महिलेचा विनयभंग केला
uttar pradesh aligarh police arrest samajwadi party leader in case of molestation with women up crime
uttar pradesh aligarh police arrest samajwadi party leader in case of molestation with women up crimeDainik Gomantak
Published on
Updated on

उत्तर प्रदेशातील अलिगढच्या सासनी गेट पोलिसांनी एका महिलेचा विनयभंग केल्याच्या आरोपाखाली समाजवादी पक्षाचे महानगर अध्यक्ष धर्मेंद्र यादव यांना अटक करण्यात आली आहे. धर्मेंद्र यादव यांच्यावर एका महिलेचा विनयभंग,तसेच फोटो काढण्यास विरोध केल्याबद्दल मारहाण आणि गोळीबार केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या संपूर्ण प्रकरणात सपा नेत्याचे नाव पुढे आले होते. त्यानंतर पीडित महिलेच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी धर्मेंद्र आणि अन्य दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

या प्रकरणी पोलिसांनी यापूर्वीच दोघांना अटक करून तुरुंगात पाठवले आहे. धर्मेंद्र यादव हे समाजवादी पक्षाच्या सरकारमध्ये महानगर अध्यक्ष होते. सी.ओ.अशोक कुमार यांनी माहिती देताना सांगितले की, रविवारी रात्री उशिरा एडीए कॉलनीतील एक जोडपे आग्रा रोडवरील एका ढाब्यावर जेवायला गेले होते. त्या वेळी सपा नेते धर्मेंद्र यादव, सुमित यादव आणि त्यांचा भाऊ कालीचरण नरेशही तेथे उपस्थित होते. कोणीतरी आपल्या मोबाईलमध्ये महिलेचा फोटो काढल्याचा आरोप आहे. ही बाब महिला व तिच्या पतीला समजताच त्यांनी विरोध केला. यावरून हे लोक दाम्पत्याला मारहाण करण्याच्या इराद्याने निघाले.(uttar pradesh aligarh police arrest samajwadi party leader in case of molestation with women up crime)

uttar pradesh aligarh police arrest samajwadi party leader in case of molestation with women up crime
8 वर्षाच्या कार्यकाळातील मोदी सरकारचे 8 मोठे निर्णय

विनयभंगाला विरोध केल्याने महिलेला मारहाण

गुंडांनी त्यांच्या इतर साथीदारांनाही ढाब्यावर बोलावल्याचे सांगण्यात येत आहे. या लोकांनी जोडप्याला मारहाण केली. धमक्या देत परवानाधारक शस्त्रांनी गोळीबार करत महिलेचा विनयभंग सुरू केल्याचा आरोप आहे. तेथे उपस्थित अन्य लोकांनी विरोध केल्यानंतर आरोपी गोळीबार करत घटनास्थळावरून पळून गेले. महिलेने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी धर्मेंद्र यादव, सुमित यादव, सोनू यादव, योगेश यादव यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सोनू यादव आणि योगेश यादव यांना यापूर्वीच अटक करून तुरुंगात पाठवले आहे.

या संपूर्ण प्रकरणाबाबत समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष गिरीश यादव यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी धर्मेंद्र यादव नावाच्या कोणत्याही व्यक्तीला ओळखण्यास नकार दिला. ते म्हणाले की, या नावाची कोणतीही व्यक्ती सपामध्ये सक्रिय नाही. ज्याने जे केले, ते तेच करणार असल्याचे त्यांनी सांगितले. नाव घेऊन पक्षाला बदनाम करण्याचे काम सुरू असल्याचे ते म्हणाले. अशा लोकांची ओळख पटवून त्यांच्यावर कारवाई केली जाईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com