Gorakhnath Temple Attack: गोरखनाथ मंदिर हल्ल्यातील दोषीला फाशीची शिक्षा, 60 दिवसांच्या सुनावणीनंतर आला निकाल

Gorakhnath Temple: गोरखनाथ मंदिरावरील हल्ल्यातील दोषी अहमद मुर्तझा अब्बासी याला एनआयएच्या विशेष न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे.
Convict Ahmed Murtaza
Convict Ahmed MurtazaDainik Gomantak
Published on
Updated on

Death Penalty For Gorakhnath Temple Attack: गोरखनाथ मंदिरावरील हल्ल्यातील दोषी अहमद मुर्तझा अब्बासी याला एनआयएच्या विशेष न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे.

गोरखनाथ मंदिर प्रकरणी अहमद मुर्तझा अब्बासी याला कलम 121 अन्वये फाशी आणि 60 दिवसांच्या विक्रमी सुनावणीनंतर आयपीसीच्या कलम 307 अंतर्गत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मुर्तझाने मंदिरात तैनात असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांवर हल्ला केला होता.

दरम्यान, मुर्तजावर UAPA अंतर्गत गुन्हा दाखल करुन त्याला दहशतवादी (Terrorist) घोषित करण्यात आले. त्याला सोमवारी सुनावणीसाठी लखनऊ येथील एनआयए/एटीएस न्यायालयात आणण्यात आले.

जिथे न्यायालयाने (Court) त्याच्याविरुद्धचे सर्व पुरावे योग्य असल्याचे मान्य केले आणि 10 महिन्यांनंतर शिक्षा सुनावली.

Convict Ahmed Murtaza
Asaram Bapu Convicted: बलात्कार प्रकरणात आसाराम बापू दोषी, उद्या शिक्षेची घोषणा

काय होते संपूर्ण प्रकरण

एप्रिल 2022 मध्ये अहमद मुर्तझा अब्बासी याने गोरखनाथ मंदिराच्या सुरक्षेत तैनात असलेल्या पीएसी जवानांवर धारदार शस्त्रांनी हल्ला केला होता.

त्याचबरोबर त्याने त्यांची शस्त्रे हिसकावण्याचा देखील प्रयत्न केला होता. त्याने त्यांच्याकडून संशयास्पद कागदपत्रेही जप्त केली होती. या प्रकरणी त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले की, त्याची मानसिक स्थिती ठीक नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com