नक्षलवादी अन् दहशतवाद्यांना शस्त्रे पुरवणाऱ्या CRPF जवानांसह 24 जणांना 10 वर्षांची शिक्षा!

Uttar Pradesh News: जिल्हा सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश विजय कुमार यांनी गुरुवारी आरोपींना दोषी ठरवले आणि शुक्रवारी निकाल सुनावला.
Arrested
ArrestedDainik Gomantak
Published on
Updated on

Uttar Pradesh Crime: नक्षलवादी आणि दहशतवाद्यांना 2010 मध्ये शस्त्रे आणि दारुगोळा पुरवल्याप्रकरणी उत्तर प्रदेशातील रामपूर येथील न्यायालयाने दोन सीआरपीएफ कॉन्स्टेबल आणि इतर सुरक्षा कर्मचाऱ्यांसह 24 जणांना 10 वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

न्यायालयाने या सर्वांना प्रत्येकी 10 हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील (ADGC) प्रताप सिंह मौर्य यांनी शनिवारी सांगितले की, जिल्हा सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश विजय कुमार यांनी गुरुवारी आरोपींना दोषी ठरवले आणि शुक्रवारी निकाल सुनावला.

या प्रकरणातील मुख्य आरोपी यशोदानंद यांचा या खटल्याच्या सुनावणीदरम्यान मृत्यू झाल्याचे मौर्य यांनी सांगितले. ते प्रयागराजमधील यूपी पोलिसांचे निवृत्त उपनिरीक्षक होते.

यूपी पोलिस आणि पीएसीमध्ये 14 गुन्हेगार आहेत

अतिरिक्त जिल्हा सरकारी वकिलांनी सांगितले की, शिक्षा सुनावण्यात आलेल्या विनोद पासवान आणि विनेश कुमार (दोघेही सीआरपीएफमधील हवालदार), नथीराम (कॉन्स्टेबल, जो पोलीस ट्रेनिंग कॉलेज, मुरादाबाद येथे तैनात होते), कॉन्स्टेबल राम किशन शुक्ला,

राम कृपाल, सुशील कुमार मिश्रा, जितेंद्र कुमार सिंग, राजेश शाही, अमर सिंग, वंश लाल, अखिलेश कुमार पांडे, अमरेश मिश्रा, दिनेश कुमार, राजेश कुमार, मनीष राय, मुरलीधर शर्मा, विनोद कुमार सिंग, ओम प्रकाश सिंग, राज्य पाल सिंग, लोकनाथ, बनवारी लाल,

आकाश कुमार, दिलीप राय आणि शंकर यांचा समावेश आहे. त्यांनी पुढे सांगितले की, यापैकी दिलीप राय, आकाश, मुरलीधर शर्मा आणि शंकर हे सामान्य नागरिक आहेत. 14 आरोपी सध्या यूपी पोलिस आणि पीएसीमध्ये कार्यरत आहेत.

Arrested
Uttar Pradesh Crime: अल्पवयीन मुलीवर बलात्कार, आरोपीला 38 दिवसांत न्यायालयाने सुनावली 25 वर्षांची शिक्षा

10 एप्रिल 2010 रोजी पहिली अटक करण्यात आली होती

मौर्य म्हणाले की, ते सर्व जामिनावर होते आणि न्यायालयाचा निकाल येईपर्यंत त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. दोषी ठरल्यानंतर त्यांना तुरुंगात पाठवण्यात आले होते.

घटनेची माहिती देताना ADGC ने सांगितले की, 10 एप्रिल 2010 रोजी STF ने रामपूर जिल्ह्यातील सिव्हिल लाईन्स पोलिस स्टेशन हद्दीतील ज्वाला नगर रेल्वे क्रॉसिंगजवळ दोन CRPF कॉन्स्टेबलना अटक केली आणि त्यांच्याकडून एक INSAS रायफल, काडतुसे जप्त केली.

मौर्य यांनी पुढे सांगितले की, त्यानंतर या दोघांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे एसटीएफने यशोदानंद (सेवानिवृत्त उपनिरीक्षक) आणि मुरादाबाद पोलिस प्रशिक्षण महाविद्यालयात तैनात कॉन्स्टेबल नथीराम यांना अटक केली.

Arrested
Uttar Pradesh Crime: 'साहेब न्याय करा...', पोलिसांच्या कारवाईला कंटाळून बलात्कार पीडितेची आत्महत्या

डायरीच्या आधारे अन्य 21 जणांना अटक करण्यात आली

मौर्य यांनी सांगितले की 29 एप्रिल 2010 रोजी एसटीएफचे आमोद कुमार यांनी एक गुन्हा दाखल केला होता, ज्यामध्ये यशोदानंद, विनोद पासवान आणि विनेश कुमार यांची नावे होती.

त्यानुसार यशोदांदकडून 1.75 लाख रुपये जप्त करण्यात आले असून त्यांच्या माहितीवरुन नथीरामला पीटीसी मुरादाबाद येथून अटक केली. मुरादाबादमध्ये नथीरामवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मौर्य यांच्या म्हणण्यानुसार, तपासादरम्यान नथीरामकडून एक डायरी जप्त करण्यात आली होती आणि त्या डायरीच्या आधारे तपासादरम्यान 21 जणांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणी एकूण 25 जणांना अटक करण्यात आली होती, त्यापैकी यशोदानंद यांचा सुनावणीदरम्यान मृत्यू झाला आणि उर्वरित 24 आरोपींना (Accused) शिक्षा सुनावण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com