UP ATSच्या तपासात गोरखनाथ मंदिर हल्ल्यातील आरोपी 'ISIS 'च्या संपर्कात असल्याचे उघड

सोशल मीडिया, बँक खात्यातील व्यवहार आणि मुर्तझा अब्बासीच्या ऑनलाइन वॉलेटचीही चौकशी
Uttar Pradesh Police Additional Director General of Police
Uttar Pradesh Police Additional Director General of PoliceANI
Published on
Updated on

गोरखनाथ मंदिराच्या (Gorakhnath Temple attack) सुरक्षेत तैनात असलेल्या पोलिसांवर अचानक धारदार शस्त्राने हल्ला करणाऱ्या मुर्तझा अब्बासीबाबत यूपी पोलिसांनी (UP Police) अनेक मोठे खुलासे केले आहेत. यूपी ATSने अब्बासीची चौकशी केली तेव्हा अनेक सोशल मीडिया, बँक खात्यातील व्यवहार आणि मुर्तझा अब्बासीच्या ऑनलाइन वॉलेटचीही चौकशी करण्यात आली. त्यानंतर तो दहशतवादी संघटना ISIS च्या लढवय्यांशी संपर्कात असल्याचे सांगण्यात आले. (Gorakhnath Temple attack)

Uttar Pradesh Police Additional Director General of Police
UP: ''सरकारी सुविधांचे कब्रस्तान'', गेटवरच गर्भवतीने दिला बाळाला जन्म

यूपी पोलिसांचे एडीजी लॉ एंड ऑर्डर प्रशांत कुमार यांनी सांगितले की, या दहशतवादी कारवायांसाठी लाखो रुपये पाठवण्याता आले होते. तपासात असे दिसून आले आहे की आरोपी मुर्तझा अब्बासी हा ISIS लढवय्यांशी आणि त्यांच्या सहानुभूतीदारांच्या संपर्कात होता. आरोपी मेहदी मसरूर बिस्वासच्या संपर्कात होता, ज्याला 2014 मध्ये बेंगळुरू पोलिसांनी ISIS ला प्रोत्साहन देण्यासाठी अटक केली होती. आरोपी दहशतवादी संघटनांच्या कट्टरपंथी प्रचारक आणि दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्यांचा प्रभाव होता. मुर्तजाने युरोप आणि अमेरिकेतील इसिस संघटनेच्या समर्थकांमार्फत सुमारे साडेआठ लाख रुपये भारतात दहशतवादी कारवाया करण्यासाठी पाठवले होते.

मोठी घटना घडवण्याचा कट

एडीजी प्रशांत कुमार यांनी सांगितले की, अब्बासी यांनी इंटरनेटच्या माध्यमातून AK-47, M4 कार्बाइन, क्षेपणास्त्र तंत्रज्ञान पाहिले आणि वाचले आणि त्यातून तो एअर पिस्तूल चालवायला शिकला. त्याच्या सुरक्षेत तैनात असलेल्या सुरक्षा जवानांची शस्त्रे हिसकावून मोठी घटना घडवण्याचा कट होता. आरोपीने 2014 मध्ये ISIS मध्ये विलीन झालेल्या दहशतवादी कार्यकर्त्यांसमोर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शपथ घेतली होती. त्यानंतर 2020 मध्ये त्याने पुन्हा शपथ घेतली.

Uttar Pradesh Police Additional Director General of Police
स्वतंत्र उच्च न्यायालयाच्या CM खट्टर यांच्या मागणीला पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी दिला पाठिंबा

3 एप्रिल रोजी मुर्तझा अब्बासीने गोरखनाथ मंदिराबाहेर पोलिसांवर धारदार शस्त्रांनी हल्ला केला होता. यावेळी एक पोलीस कर्मचारीही जखमी झाला. ज्याचे हत्यार अब्बासी हिसकावण्यात यशस्वी होऊ शकला नाही. आणि यानंतर झालेल्या चकमकीत पोलिसांनी त्याला अटक केली होती. मंगळवारी सकाळपासून सात दिवसांच्या कोठडीत एटीएसने आरोपीची सखोल चौकशी केली. राज्याच्या राजधानीतील विशेष एटीएस न्यायालयाने पुढील चौकशीसाठी सात दिवसांची कोठडी मंजूर केल्यानंतर त्याला लखनऊला हलवण्यात आले.आरोपीला यापूर्वी गोरखपूर कारागृहात ठेवण्यात आले होते, त्यानंतर त्याची पोलीस कोठडी 16 एप्रिल रोजी संपल्यानंतर त्याला आता पुन्हा 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com