

नवी दिल्ली: विमान प्रवास करताना मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंग व अन्य नियम न पाळणाऱ्या बेशिस्त प्रवाशांसाठी मुलकी विमान वाहतूक संचालनालयाने (डीजीसीए ) कठोर निर्बंधांचा व त्यांचे पालन न केल्यास प्रवास बंदीसह अन्य शिक्षांचा समावेश असलेले नवे दिशानिर्देश आज जारी केले.
विमानोड्डाण मार्गदर्शक प्रणाली जाहीर
केंद्रीय विमानोड्डाण मंत्रालयाने आज नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहे. केंद्रीय विमान उड्डाण खात्याचे मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी ही तत्त्वे जारी केली आहे. विमानतळावर कोरोना नियंत्रणासाठी ठरवण्यात आलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे असून प्रवासी, सुरक्षाकर्मी, विमानाचे कर्मचारी तसेच अधिकारी या सर्वांनी तोंडाला मास्क लावणे, सुरक्षित अंतर ठेवणे सक्तीचे केले आहे.
महाराष्ट्रासह देशाच्या किमान सहा राज्यांत कोरोनाचा पुन्हा विस्फोट होण्याच्या सद्यःस्थितीत वारंवार इशारे देऊनही अनेक विमान प्रवासी कोविड निर्बंधांचे पालन योग्य प्रकारे करत नसल्याच्या वाढत्या तक्रारी येऊ लागल्यावर डीजीसीएने हे दिशानिर्देश जारी केले. देशभरातील विमानतळांची प्रशासने, विमान कंपन्या आदींनाही याबाबत कडक काळजी घेण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. सर्व प्रवाशांनी व्यवस्थितपणे मास्क लावले आहेत की नाही, विमानतळ परिसरात सोशल डिस्टन्सिंग पाळले जात आहे का नाही हे काटेकोरपणे पाहण्याची जबाबदारी या यंत्रणांची असेल. कोणत्याही विमानात अचानक जाऊन तपासणी करण्याचेही अधिकार विमानतळ प्राधिकरण अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
बेशिस्त प्रवाशांवर दंड व वारंवार बेजबाबदारपणे वागणाऱ्या प्रवाशांवर पहिल्या टप्प्यात तीन महिने प्रवासबंदी लादणे या सक्तीच्या उपायांचा समावेश आहे. विमान कर्मचाऱ्यांच्या नम्र विनंतीला त्यांच्यावर हल्ला करून, त्यांच्या अंगावर धावून जाऊन, शिवीगाळ करून प्रत्युत्तर देणाऱ्या असभ्य प्रवाशांच्या संगणकीय नोंदीतील नावाला अनियंत्रित किंवा बेकाबू प्रवासी असा शेरा मारून तो डीजीसीएच्या संकेतस्थळाच्या माध्यमातून साऱ्या विमान कंपन्यांपर्यंत पोहोचविला जाईल व त्याच्यावर प्रवासबंदी कारवाई तत्काळ झाली की नाही यावरही डीजीसीए यंत्रणा काटेकोर लक्ष ठेवेल.
प्रमुख दिशानिर्देश
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.